सांगोला : अज्ञात कारणावरून विवाहित महिलेने राहत्या घरी नायलॉन दोरीच्या साहाय्याने घराच्या वाशाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी ६ वा. घडली. उषा राजेंद्र इंगवले (वय ३९, रा. मेडशिंगी, ता. सांगोला) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. उषा इंगवले या विवाहित महिलेने अज्ञात कारणावरून मंगळवारी सकाळी गळफास घेतला. तिला जखमी अवस्थेत उपचाराकरिता सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. या घटनेची वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास नागणे याने सांगोला पोलिसांत खबर दिली. तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सविता कलटवाड करीत आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}