शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय शेतीमुळे मैंदर्गीच्या माळरानावर २८ कांड्यांचा ऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 14:50 IST

सेंद्रिय शेती : पारंपरिक शेतीला फाटा, दुष्काळावर मात करीत नवा प्रयोग

ठळक मुद्दे अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील प्रा. तोटप्पा हसरमनी यांनी पारंपरिक शेतीपाच एकरावर एक डोळा उसाची लागवडदुष्काळावर मात करत सेंद्रिय शेतीचा अवलंब

शिवानंद फुलारी अक्कलकोट : तालुक्यातील मैंदर्गी येथील प्रा. तोटप्पा हसरमनी यांनी पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत दुष्काळावर मात करत सेंद्रिय शेतीचा अवलंब केला आहे. पाच एकरावर एक डोळा उसाची लागवड केली आहे. त्याला सध्या २८ कांड्या आहेत. बांबूसारख्या पिकलेल्या उसाचे गुºहाळ करून ‘गुºहाळ घर’ ते बनविणार आहेत. गुळाला जागतिक बाजारपेठेत चांगला भाव असल्याने तिकडे गूळ पाठविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

पुण्यात नोकरी असली तरी प्रा. हसरमनी यांची वडिलोपार्जित जमीन मैंदर्गी येथे आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने सेंद्रिय शेतीचे स्वप्न पाहून त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बोअरच्या माध्यमातून पाच एकरमध्ये एक कांडी उसाची लागवड केली आहे. त्याला ठिबकद्वारे पाणी देण्यात येत असून, पूर्णपणे रासायनिक मात्रांचा वापर टाळून ते सेंद्रिय पद्धतीने ऊस वाढवत आहेत. दहा महिन्यांच्या कालावधीतच २८ कांड्यांचा ऊस आहे.

बारा महिन्यांनंतर सेंद्रिय गूळ तयार करून देशातील मल्टी शहरासह, विदेशात विक्री करण्यासाठी सध्या गूळ घर ते तयार करीत आहेत. त्यांना सांगलीचे कृषीभूषण संजीव माने, डॉ. प्रा. विशाल सरदेशमुख, डॉ. होलमुखे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. तोटप्पा हसरमनी यांना या कामासाठी अभियंत्या असलेल्या त्यांच्या पत्नी शिवलीला हसरमनी, त्यांच्या आई शिवलिंगाव्वा हसरमनी यांची मदत मिळत आहे. ते विद्युत अभियांत्रिकीचे पदवीधर असले तरी कृषी क्षेत्रातून ते पीएच. डी करीत आहेत.

खत, पाणी व्यवस्थापन...च्ऊस लागवड करण्याआधी तागाची लागवड करून रोटरने त्याला जमिनीत गाढण्यात आले. भरणीवेळी कोंबडी खत, निंबोणी पेंड, मायक्रोन ड्रीयन्स सूक्ष्मजीव वायूचाही वापर खत फवारणीत करण्यात आला. बीज लागवडीपूर्वी २०० लिटर पाण्यामध्ये बियाणे बुडवून लागवड केली. नत्र, स्फूरद, पालाश याचाही वापर करण्यात आला. खत याचे स्थिरीकरण आले.यामुळे हुमणी,मावा,करपा या रोगापासून संरक्षण मिळते. तण महिला मजुरांच्या माध्यमातून काढण्यात आले. त्यात आंतरपीक म्हणून कावेरी वाणाच्या गव्हाची पेरणी करण्यात आली. दहा क्विंटल गव्हाचे उत्पन्नही त्यांना मिळाले आहे.

सध्या देशाला विषमुक्त सेंद्रिय शेतीची गरज आहे. नोकरी करण्यापेक्षा शेती आता महत्त्वाची बनत असून, नवनवीन प्रयोग व कमी पाण्यावर शेती यशस्वी होत आहे. भविष्यात सोलवर शेती, विदेशी मार्केट विकसित करण्याचा माझा मानस आहे.-प्रा. तोटप्पा हसरमनी

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी