शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

लसीकरण थांबवणे माझ्या हातात नाही; पालकमंत्री देशमुखांचे प्रणिती शिंदेंना उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 6:02 PM

ऋषीकेश डोंबाळे मृत्यू : प्रणिती शिंदेंचा विजयकुमार देशमुखांना घेराव

सोलापूर : ऋषीकेश डोंबाळे मृत्यू प्रकरणानंतर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना घेराव घालत चुकीच्या पद्धतीने, जबरदस्तीने लस दिली जात असल्याची तक्रार केली़ राज्यभर दिली जात असलेली रुबेला लस तत्काळ थांबवण्याची मागणी केली असता, ही आरोग्याची योजना ही वरूनच आहे, त्याला थांबवणे आपल्या हातामध्ये नसल्याचे पालकमंत्री म्हणाले.

रुबेला लस दिल्यानंतर अत्यवस्थ झालेला औज (द़ सोलापूर) येथील ऋषीकेश डोंबाळे या विद्यार्थ्याचा सोमवारी रात्री मृत्यू झाला़. त्यानंतर रात्री त्याच्या नातेवाईकांनी गर्दी केली़ सकाळी ११.३० वाजता आ़ प्रणिती शिंदे या कार्यकर्त्यांसमवेत शासकीय रुग्णालयात पोहोचल्या. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेसचे बाबा करगुळे, महिला आघाडीच्या सुमन जाधव, तौफिक हत्तुरे, हेमा चिंचोळकर, तिरुपती परकीपंडला, राहुल मर्दा, गणेश गायकवाड, सुभाष वाघमारे आणि राहुल गोयलसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

ऋषीकेशच्या माता-पित्यांची भेट घेऊन सांत्वन केलेपिवळे रेशन कार्ड असतानाही बाहेरून औषधे आणायला लावल्याची तक्रार ऋषीकेशच्या पालकांनी केली़ शासकीय रुग्णालयात प्राथमिक अवस्थेत त्याच्यावर तत्काळ उपचार झाले नाहीत़ एकुलता एक मुलगा गमावल्याचे सांगत त्याच्या मातेने हंबरडा फोडला़पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची भेट घेऊन आमदार शिंदे म्हणाल्या, आपण पालकमंत्री आहात, जिल्ह्याचे पालक आहात, ही लस तत्काळ थांबवा, तिचा अभ्यास करा, मगच द्या.

जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन लस थांबवण्याची केली मागणी ऋषीकेशच्या पालकांना भेटून आ़ प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेतली़ यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत प्रत्येक शाळेत दिली जात असलेली लस ही प्रशिक्षणार्थी परिचारिकांच्या हातून ती मुलांना जबरदस्तीने दिली जात असल्याचा आरोप करत पालकांना पूर्वकल्पना वा त्यांच्या संमतीशिवाय दिली जात असल्याचे त्या म्हणाल्या. जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील ही लस देणे आपण थांबवू शकत नसल्याचे सांगत पालकांच्या संमतीने त्यांच्यासमोर देण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना केल्याचे त्यांनी सांगितले़ 

मुलांचा विमा उतरवा मगच लस द्या: नरोटेपालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना घेराव घातल्यानंतर नगरसेवक चेतन नरोटे यांनी पालकांच्या संमतीशिवाय ही लस देण्याचा खटाटोप आरोग्य यंत्रणेचा सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित करत हे असेच चालू राहिले तर आणखी दहा मुलांचे बळी जातील, असे म्हणाले़ तत्पूर्वी तज्ज्ञांनी, नियुक्त वैद्यकीय पथकाने या लसीचा अभ्यास करून ती द्यावी, त्याही आधी सर्व मुलांवर सुरक्षा विमा उतरवावा, मगच ती लस द्यावी, अशी मागणी केली़ तसेच ऋषीकेश हा डोंबाळे पालकांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली़

वातावरण तापले, प्रशासनाचे कोणीच भेटले नाहीशासकीय रुग्णालयात ऋषीकेशच्या नातेवाईकांना भेटायला आलेल्या आ़ प्रणिती शिंदे यांना तापलेल्या वातावरणात प्रशासनाचे जबाबदार अधिकारी कोणीच भेटू शकले नाहीत़ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांच्या तत्काळ असहकार्याची बाब त्यांच्यापुढे आली़ येथील असहकार्य, गैरसोयीचा पाढाही आमदार शिंदे यांनी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री तथा आरोग्य राज्यमंत्र्यांपुढे वाचला.

टॅग्स :Praniti Shindeप्रणिती शिंदेVijay Deshmukhविजय देशमुख