नेत्यांचे कान भरायचं बंद करा, जे काम करतील तेच पदावर राहतील; जयंत पाटलांचा सुचक इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2022 13:38 IST2022-02-22T13:37:40+5:302022-02-22T13:38:52+5:30

सोलापुरात राष्ट्रवादी पदाधिकारी मेळावा

Stop listening to the leaders, only those who work will remain in office; A warning from Jayant Patel | नेत्यांचे कान भरायचं बंद करा, जे काम करतील तेच पदावर राहतील; जयंत पाटलांचा सुचक इशारा

नेत्यांचे कान भरायचं बंद करा, जे काम करतील तेच पदावर राहतील; जयंत पाटलांचा सुचक इशारा

सोलापूर : नेत्यांचे कान भरायचं बंद करा, जनतेत मिसळून काम करा जे काम करणार नाही त्यांना पदावर ठेवले जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिला.

सोलापूर येथे आयोजित राष्ट्रवादी पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सोलापूर शहर व जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे शंभर आमदार करायचे आहेत. सोलापूर शहरात एकही आमदार नाही. आज राष्ट्रवादी सत्तेत आहे ते केवळ शरद पवार यांच्या कल्पनेमुळे त्यांना मानणारे इतर पक्षात आहेत म्हणून आज आपल्याला मानाचे स्थान मिळाले आहे. काहीही करून आपल्याला ताकद वाढवावी लागेल, त्यामुळे मुंबईच्या चक्रा बंद करा लोकांपर्यंत जा सर्व सेल बळकट करा अशाही सुचना यावेळी त्यांनी दिल्या. 

----------

जिल्हा कार्यकारणीची घेतली हजेरी...

बैठकीच्या सुरुवातीला जयंत पाटील यांनी सर्व जिल्हाध्यक्ष व कार्यकारणी यांची हजेरी घेतली. जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे यांनी अनेकांनी पदे घेतली पण काम कोणीच करत नाही अशी खंत मांडली. पदाधिकाऱ्यांनी बैठकीचा निरोप मिळाला नाही अशीही तक्रार केली. जिल्हा कार्यकारिणीत गोंधळ आहे, याची दखल पाटील यांनी घेतली सर्वांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना त्यांनी दिल्या.

 

Web Title: Stop listening to the leaders, only those who work will remain in office; A warning from Jayant Patel