शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

राज्यातील साखर कारखान्यांना राज्य बँकेचे सहकार्य, १२०० कोटींची केली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:30 PM

आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील साखर कारखान्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कर्जरूपाने मदतीचा हात दिला आहे.

ठळक मुद्देसाखर कारखानदारीला मदत करण्याचे सरकारचे धोरणराज्य सहकारी बँकेने गरजू कारखान्यांना यंदाच्या गळीत हंगामासाठी कर्ज पुरवठा केला सोलापूर जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांनी ऊस विलाची थकीत रक्कम दिली

सोलापूर :  आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील साखर कारखान्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कर्जरूपाने मदतीचा हात दिला आहे . गळीत हंगामासाठी १२०० कोटींची कर्जे देण्यात आली असून सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्याला ४० कोटींची मदत देऊन थकीत एफआरपी चुकती करण्यासाठी हातभार लावला आहे.

साखरेचे भाव कोसळल्याने राज्यातील अनेक कारखान्यांनी साखर विक्री केली नव्हती , परिणामी शेतक?्यांच्या ऊस बिलाची एफआरपी देताना त्यांना आर्थिक अडचणीना तोंड द्यावे लागले . राज्यभरातील साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती सक्षम नसल्याने अनेक कारखान्यांनी एफ आर पी ची थकीत रक्कम दिली नव्हती .  सरकारने वारंवार कारखान्यांना तंबी देऊनही फारसा फरक पडला नव्हता .  कारखाने साखरेचा भाव कोसळल्याने आपली आर्थिक कोंडी झाल्याचे वारंवार सांगत होते मात्र केंद्र सरकारने साखरेला २९००  रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केल्याने साखर कारखानदारांना दिलासा मिळाला आहे.

साखर विक्री साठी कोटा पद्धत असल्याने एकाच वेळी साखरेची विक्री करता येत नाही ,  हे कारण देखील कारखानदारांनी पुढे केले त्यामुळे साखरेला हमीभाव मिळूनही एफ आर पी ची रक्कम देण्यात काही कारखाने अपयशी ठरले आहेत अशा कारखान्यांना गाळप परवाना देणार नाही असा फतवा राज्याच्या साखर आयुक्तांनी काढला मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालीच नाही अखेर साखर कारखान्यांची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून अर्थसहाय्य करण्याचा प्रयत्न सहकार खात्याच्या पुढाकाराने झाला. --------  राष्ट्रीयकृत बँकांचा नकारएकेकाळी साखर कारखानदारीला मुबलक कर्जपुरवठा करणा?्या राष्ट्रीयकृत बँकांनी अलीकडे आखडता हात घेतला आहे त्यामुळे राज्यातील साखर कारखान्यांची सारी भिस्त आता सहकारी बँकावर अवलंबून  आहे . राज्य सहकारी बँकेने सहकारी आणि खासगी कारखान्यानाही अर्थसाहाय्य करून हातभार लावला आहे. ----------१२०० कोटींचा कर्जपुरवठाराज्यातील साखर कारखानदारीला उभारी येण्यासाठी राज्य सहकारी बँकेने चालू गळीत हंगामासाठी १२०० कोटींचा कर्ज पुरवठा केला आहे  . यात सांगली  , सातारा ,  कोल्हापूर  , सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची संख्या अधिक असून रक्कम ही जास्त आहे  . या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यातील कारखाने आणि कर्जाच्या रकमा कमी आहेत. ------सिद्धेश्वरला ३९.६०  कोटी कर्जसोलापूर जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांनी ऊस विलाची थकीत रक्कम दिली नाही या कारखान्यांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन एफ आर पी अदा करण्यासाठी राज्य बँकेने कर्ज दिले आहे सिद्धेश्वर कारखाना कुमठे ३९.६०  कोटी , आदिनाथ ,करमाळा २० कोटी , स . म . मोहिते-पाटील अकलूज ४८.६५  कोटी , संत शिरोमणी काळे भाळवणी  २४.६४ कोटी , विठ्ठल पंढरपूर  ५४ कोटी , विठ्ठल कापोर्रेशन  २१ कोटी  , संत दामाजी मंगळवेढा  १९.२८ कोटी  , मकाई वांगी  ११.२० कोटी ,  भीमा टाकळीसिकंदर  ६५ कोटी , लोकमंगल भंडारकवठे  ४० कोटी , लोकमंगल बीबीदारफळ २० कोटी कर्जपुरवठा केला आहे .---------साखर कारखानदारीला मदत करण्याचे सरकारचे धोरण आहे त्याच भूमिकेतून राज्य सहकारी बँकेने गरजू कारखान्यांना यंदाच्या गळीत हंगामासाठी कर्ज पुरवठा केला आहे याबाबत बँकेचे उदार धोरण आहे      अविनाश महागावकरप्रशासकीय संचालक , राज्य सह. बँक , 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्र