भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
By आप्पासाहेब पाटील | Updated: May 2, 2025 19:10 IST2025-05-02T19:09:44+5:302025-05-02T19:10:58+5:30
या धडकेत कारमधील तिघां भाविकांचा मृत्यू झाला. अक्कलकोट येथील श्री. स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन तुळजापूरला तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीवर काळाने झडप टाकली.

भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
सोलापूर : भरधाव वेगात निघालेल्या कंटनेरने समोरून येत असलेल्या दोन कारला जोरात धडक दिली. या धडकेत कारमधील तिघां भाविकांचा मृत्यू झाला. अक्कलकोट येथील श्री. स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन तुळजापूरला तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीवर काळाने झडप टाकली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, अक्कलकोटमार्गे तुळजापूरला निघालेल्या कारचा चप्पळगाव गावाजवळ अपघात झाला. हा अपघात चपळगांवातील पटेलच्या शेताजवळील ब्रिजजवळ झाला आहे. भरधाव वेगातील कंटेनरने दोन कारला जोराची धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दोघांची प्रकृती गंभीर आहे. मृत व जखमी हे पुण्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. श्री स्वामी समर्थ दर्शन करून तुळजापुरला जात असताना हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात आले. अपघातातील मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत, अक्कलकोट येथे उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात जखमींना हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले.