शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

सोलापूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांनी हमीभाव केंद्राकडे फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 3:29 PM

हमीभाव केंद्रापेक्षा बाजारात अधिक दर मिळाल्याचा परिणाम 

ठळक मुद्देपाऊस नसल्याने यंदा अन्य पिकांप्रमाणेच सोयाबीनचे उत्पादन अल्पसेबाजारात चांगला दर मिळाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी हमीभाव केंद्राकडे  फिरकलेही नाहीतआॅनलाईन नोंदणी केलेल्या अवघ्या दोन शेतकºयांनीही बाजारात विक्रीला पसंती दिली.

सोलापूर : पाऊस नसल्याने यंदा अन्य पिकांप्रमाणेच सोयाबीनचे उत्पादन अल्पसे आले.  बाजारात चांगला दर मिळाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी हमीभाव केंद्राकडे  फिरकलेही नाहीत. आॅनलाईन नोंदणी केलेल्या अवघ्या दोन शेतकºयांनीही बाजारात विक्रीला पसंती दिली.

 सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने बार्शी तालुक्यात सोयाबीनचे पीक घेतले जाते. मराठवाडा लगतच्या अक्कलकोट, उत्तर व दक्षिण तालुक्यातील शेतकरी सोयाबीन घेतात. जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील शेतकरीही सोयाबीनच्या पेरणीचा प्रयोग करु लागले आहेत. पाऊस चांगला असलेल्या मागील दोन-तीन वर्षांत बार्शी, सोलापूर,अक्कलकोट येथील हमीभाव केंद्रावर  सोयाबीनची विक्री झाली होती. यावर्षी दुष्काळी स्थितीमुळे अक्कलकोट व सोलापूर या ठिकाणीच  हमीभाव केंदे्र सुरू झाली. यापैकी सोलापूर येथील हमीभाव केंद्रावर दोन शेतकºयांनी सोयाबीनची आॅनलाईन नोंदणी केली होती. प्रत्यक्षात एकाही शेतकºयाने हमीभाव केंद्रावर सोयाबीनची विक्री केली नाही. हमीभाव केंद्रावर सोयाबीनला प्रतिक्विंटल ३९०० रुपये दर आहे. बाजारात मात्र सोयाबीनला प्रतिक्विंटल ४२०० रुपयांचा दर मिळाला.

सोलापूर येथील हमीभाव केंद्रावर मूग ३५० व उडीद २९५ तर अक्कलकोट केंद्रावर मूग ४१५ व उडीद ३११ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. प्रत्यक्षात उडीद अक्कलकोट केंद्रावर १९३ शेतकºयांचा ७४४ क्विंटल तर सोलापूर केंद्रावर १०१ शेतकºयांचा ३२५ क्विंटल खरेदी झाला आहे.  अक्कलकोट केंद्रावर १८५ शेतकºयांचा मूग १४३० क्विंटल तर सोलापूर केंद्रावर १४५ शेतकºयांचा ६६९ क्विंटल खरेदी झाला आहे. 

नोंदणी ४२२ अन् खरेदी ४२ ...- यावर्षी अक्कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ या तालुक्यात मका पाहावयाला मिळाली नाही. मका हमीभाव केंदे्रही अकलूज, मंगळवेढा, पंढरपूर व नातेपुते या ठिकाणी सुरू झाली आहेत. याठिकाणीही म्हणावा तसा प्रतिसाद नसल्याचे आकडेवारीवरुन दिसते. चार केंद्रावर ४२२ शेतकºयांनी नोंदणी केली; मात्र ४२ शेतकºयांनीच मका विक्री केली.  अकलूज केंद्रावर १८० शेतकºयांनी नोंदणी केली असली तरी १२ शेतकºयांची ४९९ क्विंटल,  मंगळवेढा केंद्रावर १२५ शेतकºयांनी नोंदणी केली; मात्र एका शेतकºयाने १३ क्विंटल, पंढरपूर केंद्रावर नोंदणी केलेल्या ४० पैकी २५ शेतकºयांची ६७२ तर नातेपुते केंद्रावर नोंदणी केलेल्या ७७ पैकी ४ शेतकºयांची १९१.५० क्विंटल मका विक्री झाली.

नोंदणी १ हजार ३७१- अक्कलकोट व सोलापूर येथील हमीभाव केंद्रावर मूग विक्रीसाठी ६०६ व उडीद ७६५ अशा एकूण १३७१ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. प्रत्यक्षात हमीभाव केंद्रावर मूग ३३० व उडीद २९४ अशा एकूण ६२४ शेतकºयांनी विक्री केला. हमीभावापेक्षा  अधिक दर मिळत असल्याने शेतकºयांनी बाजारात धान्य विक्री केल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार