Solapur woman murdered for Diwali | दिवाळीसाठी वडिलाकडे आलेल्या विवाहित महिलेचा सोलापुरात खून

दिवाळीसाठी वडिलाकडे आलेल्या विवाहित महिलेचा सोलापुरात खून

ठळक मुद्दे- रेल्वे रूळाशेजारी आढळला मृतदेह- दिवाळी सण साजरा करण्याासाठी आली होती विवाहित महिला- घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांनी दिली घटनास्थळाला भेट

सोलापूर : दिवाळी सणासाठी वडिलाकडे आलेल्या विवाहित महिलेचा सोलापूर शहरातील दमाणी नगरात खून झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली़ या घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाºयांसह कर्मचाºयांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

प्रियंका तुकाराम गोडगे (रा़ साकत, ता़ बार्शी) असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे़ प्रियंका ही मुळ दमाणी नगरातील रहिवाशी आहे़ मृत प्रियंका हिचा साकत (ता़ बार्शी) येथील तुकाराम गोडगे याच्याबरोबर विवाह झाला होता़ प्रियंका हिला अडीच वर्षाची मुलगी आहे़ दिवाळी सण साजरा करण्यासाठी दमाणी नगरात आपल्या वडिलांकडे आली होती़ गुरूवारी रात्री नऊच्या सुमारास मुलगी आजारी असल्याने तिला उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखविण्यासाठी घेऊन गेली होती.

याचवेळी अज्ञात मारेकºयांनी तिला दमाणी नगर परिसरात असलेल्या रेल्वे रूळाशेजारी नेऊन जिवे ठार मारले़ या घटनेची माहिती मिळताच प्रियंकांच्या कुटुंंबियांनी घटनास्थळला भेट देऊन बेशुध्द अवस्थेत पडलेल्या प्रियंका हिला उपचारासाठी शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल केले़ मात्र उपचारापुर्वीच ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले़ त्यानंतर प्रियंका हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Solapur woman murdered for Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.