शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद पाडला; मोहोळजवळ वाहनांच्या अडीच किलोमीटरपर्यंत रांगा

By appasaheb.patil | Updated: October 31, 2023 11:58 IST

पोलिस घटनास्थळावर येताच आंदोलनकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सोलापूर : मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन तीव्र होत आहे. सोलापूर-पुणे हायवे मंगळवारी बंद पाडला. मोहोळ शहरातील मराठा समाज बांधव हायवेवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अचानक आंदोलन केल्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. काही तास वाहतूक खोळंबली होती. पोलिस घटनास्थळावर येताच आंदोलनकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, एक मराठा...लाख मराठा...आरक्षण आमच्या हक्काचं..नाही कोणाच्या बापाचं..अशा एकापेक्षा एक घोषणांनी अक्कलकोट रोड दणाणून गेला होता. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आंदोलकांना ताब्यात घेत रस्त्यावरील जळते टायर बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. अर्धा तासभर वाहतूक खोळंबली होती, वाहनांच्या अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.

दरम्यान, मंगळवारी सकाळपासून आरक्षणाच्या मागणीसाठी विविध ठिकाणी आमरण उपोषण, रास्ता रोको, टायर जाळणे व गावबंदीचा ज्वर गावोगावी पसरला आहे. गावागावांत रात्रंदिवस मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळी आंदोलने सुरू झाली आहेत. मराठा समाज बांधव आक्रमक आंदोलन करीत राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी केली आहे. त्याबाबतचा फलक गावाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे. मंगळवारी सकाळपासून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या घरासमोर पोलिसांनी बंदाेबस्त वाढविला आहे. 

दरम्यान, सोलापूर आगारातून बाहेरील जिल्ह्यात जात असलेल्या एसटी गाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मंगळवारी सकाळी मराठा समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालय बंद पाडले. याशिवाय विविध ठिकाणी आंदोलनाचे स्वरूप तीव्र होत आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण