शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर पोलीस जाणार आठवड्यातून दोनवेळा गुन्हेगारांच्या घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 14:45 IST

विलास जळकोटकर ।  सोलापूर : वाढणाºया गुन्हेगारीचं प्रमाण रोखण्यासाठी.. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांनी ‘गुन्हेगार निगराणी ...

ठळक मुद्देनव्या वर्षात नवा फंडा राबवण्यावर पोलीस आयुक्तालयानं भर दिला सराईत गुन्हेगाराच्या घरावर पाळत ठेवण्यात येणारआठवड्यातून दोनवेळा त्याच्या घरी पोलिसांनी भेटी दिल्यानंतर त्याच्यावर वचक बसेल

विलास जळकोटकर । 

सोलापूर: वाढणाºया गुन्हेगारीचं प्रमाण रोखण्यासाठी.. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांनी ‘गुन्हेगार निगराणी योजना’ सुरू केली आहे. याद्वारे सराईत गुहेगारांवर पाळत ठेवण्यात येत आहे. आठवड्यातून दोनवेळा पोलीस त्याच्या घरी भेटी देणार आहेत. नव्या वर्षात नवा फंडा राबवण्यावर पोलीस आयुक्तालयानं भर दिला आहे. 

पोलीस आयुक्तालयाच्या सातही पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांकडून वारंवार चोºया, घरफोडी, मारामारी अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडतात अशी माहिती समोर आली. यावर पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या सूचनेनुसार सहा. पोलीस आयुक्त अभय डोंगरे यांनी गुन्हेगार निगराणी योजना अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेऊन ती सक्रिय केली आहे. 

या योजनेद्वारे पोलीस रेकॉर्डवर वाढलेल्या गुन्हेगारीचे प्रमाण कमी व्हावे, पोलिसांचा वारंवार होणारा ससेमिरा यामुळे गुन्हेगारावरही दहशत निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम हाती घेतला. गुन्हे शाखेच्या वतीने पाच पथकांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक पथक शहरातील सातही पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांची यादी घेऊन त्यांच्या घरावळ पाळत ठेवणार आहेत. चोरी,दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल होताच सराईत गुन्हेगार घरी आहे का याची तपासणी होणार आहे. पुन्हा पुन्हा गुन्ह्यामध्ये आढळणाºया गुन्हेगारांकडून इंटरागेशन फॉर्म भरुन घेण्यात येणार आहे. त्यामध्ये त्याचे संपूर्ण नाव, फोटो, त्याचा पूर्व इतिहास असा डाटा जमा करण्याचे काम सुरु झाले असल्याचे सांगण्यात आले.

गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी प्रयत्नच्एखादा गुन्हा होऊच नये या दृष्टीने ही संकल्पना नव्या वर्षात आणली गेली आहे, सीसीटीव्ही कॅमेरा, श्वान पथक या बाबींचा वापर गुन्हे घडल्यानंतर तपासाच्या दृष्टीने करण्यात येतो; मात्र तो गुन्हा पुन्हा घडू नये यासाठी सराईत गुन्हेगाराच्या घरावर पाळत ठेवण्यात येणार आहे.  आठवड्यातून दोनवेळा त्याच्या घरी पोलिसांनी भेटी दिल्यानंतर त्याच्यावर वचक बसेल. अशा कृत्यापासून तो परावृत्त होईल, अशी अपेक्षा आहे. हे सामूहिक काम आहे. पोलीस अन् जनता या दोहोंच्या सक्रिय सहभागातून ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे यांनी ‘लोकमत’शी स्पष्ट केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी