सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
By आप्पासाहेब पाटील | Updated: April 28, 2025 13:01 IST2025-04-28T12:59:04+5:302025-04-28T13:01:54+5:30
Solapur Bazar Samiti Result today: सोलापूर बाजार समितीच्या मतमोजणीला सोमवारी सकाळी आठ वाजता सुरू झाली. मतमोजणीच्या सुरूवातीला सुभाष देशमुख गटानी कल्याणशेट्टी गटावर मात केले आहे.

सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
-आप्पासाहेब पाटील, सोलापूर
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी सुरू झाली असून सुरूवातीला ग्रामपंचायत गटातील चार जागांसाठी मतमोजणी झाली. त्यात भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनेलमधील तिघे जण विजयी झाले आहेत. त्यात सर्वसाधारण गटातून सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनिष देशमुख यांच्यासह माजी संचालक रामाप्पा चिवडशेट्टी व अनुसुचित जाती गटातून अतुल गायकवाड यांचा विजय झाला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आर्थिक दुर्बल गटातून भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनेलचे उमेदवार सुनील कळके हे विजयी झाले आहेत.
दरम्यान, सोलापूर बाजार समितीच्या मतमोजणीला सोमवारी सकाळी आठ वाजता सुरू झाली. मतमोजणीच्या सुरूवातीला सुभाष देशमुख गटानी कल्याणशेट्टी गटावर मात केले आहे. मात्र सोसायटी मतदारसंघात सर्वाधिक अकरा जागा आहेत. त्यामुळे सोसायटी गटातील निकाल महत्वपूर्ण ठरणार आहे.
वाचा >>जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
सोसायटी गटाच्या निकालातूनच बाजार समितीवर कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. सोसायटी गटात माजी आमदार दिलीप माने, माजी उपसभापती सुरेश हसापुरे, श्रीशैल नरोळे, माजी सभापती राजशेखर शिवदारे, इंदुमती अलगोंडा-पाटील, माजी संचालक आप्पासाहेब पाटील-वडकबाळकर, चनगोंडा हविनाळे या प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठापणाला चांगली आहे.
शिवाय व्यापारी मतदारसंघात पाच जण रिंगणात आहेत. तर हमाल तोलार गटात आठ जण रिंगणात आहेत. सध्या १८ जागांपैकी ४ जागांचा निकाल जाहीर झाला आहे. त्यातील तीन आमदार सुभाष देशमुख गटाकडे तर एक जागा कल्याणशेट्टी गटाकडे आहे. उर्वरित १४ जागांची मतमोजणी सुरू आहे.