सोलापुरात तुफान पावसात सुसाट रिक्षा डिव्हायडरला धडकल्याने चालक जखमी

By विलास जळकोटकर | Updated: June 12, 2024 19:33 IST2024-06-12T19:33:02+5:302024-06-12T19:33:18+5:30

साट निघालेली रिक्षा अचानक डिव्हायडरला धडकल्याने चालकाला जखमी व्हावे लागले.

Solapur driver of rickshaw hit the divider during heavy rain | सोलापुरात तुफान पावसात सुसाट रिक्षा डिव्हायडरला धडकल्याने चालक जखमी

(प्रातिनिधीक छायाचित्र)

सोलापूर : धो-धो पाऊस कोसळत असताना घराकडे लवकर पोहचण्यासाठी सुसाट निघालेली रिक्षा अचानक डिव्हायडरला धडकल्याने चालकाला जखमी व्हावे लागले. ११:१० च्या सुमारास सरस्वती चौकात ही घटना घडली. नागेश भीमाशंकर गुळजकर (वय- ३८, रा. दत्त चौक, सोन्या मारुती सोलापूर) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे.

यातील जखमी रिक्षाचालक रेल्वे स्टेशनकडून दत्त चौकाकडे निघाले होते. धो-धो पाऊस सुरू असताना घरी लवकर जाण्याच्या धांदलीत त्यांची रिक्षा सरस्वती चौकात डिव्हायडरला धडकल्याने त्याच्या पायाला, डोक्याला जखम झाली. भाऊ परशुराम याने लागलीच येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

वाहने जपून चालवा

दरम्यान या प्रकारामुळे पावसाळ्यात वाहने चालवताना खबरदारी घ्यावी अन्यथा जायबंदी होऊन जीवावर बेतण्याची शक्यता असते यासाठी सावधानता बाळगावी असे आवाहन पोेलिसांसह डॉक्टरांनी केले आहे.

Web Title: Solapur driver of rickshaw hit the divider during heavy rain