शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या निम्माही पाऊस पडला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 15:20 IST

करमाळ्यात सर्वात कमी पाऊस : डाळिंबाला तेल्या रोगाचा धोका

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी १८० मिलिमीटर आहे गतवर्षी १३ आॅगस्ट २०१७ पर्यंत २४६.८२ मिलिमीटर पाऊस पडला होतायंदा या तारखेपर्यंत फक्त ११०.६७ मिलिमीटर पाऊ स पडला आहे

गोपालकृष्ण मांडवकर सोलापूर : यंदा पावसाने मारलेली दडी शेतकºयांची चिंता वाढविणारी आहे. यंदाच्या पावसाने गतवर्षीची सरासरी ओलांडणे तर सोडाच निम्माही पाऊस झाला नाही. यामुळे शेतशिवार तहानलेला असून, पीक परिस्थितीही धोक्यात आली आहे.

१३ आॅगस्टपर्यंतची परिस्थिती विचारात घेता सोलापूर जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी १८० मिलिमीटर आहे. गतवर्षी १३ आॅगस्ट २०१७ पर्यंत २४६.८२ मिलिमीटर पाऊस पडला होता. यंदा या तारखेपर्यंत फक्त ११०.६७ मिलिमीटर पाऊ स पडला आहे. ही टक्केवारी ४४.७६ आहे. 

सोलापूर जिल्ह्यात सिंचन मोठ्या प्रमाणावर होते. उसाचे क्षेत्र मोठे आहे. असे असतानाही पावसाची टक्केवारी अद्यापही निम्म्याच्या खालीच आहे. यामुळे शेतकºयांची आणि प्रशासनाचीही चिंता यंदा वाढलेली दिसत आहे. आतापर्यंत बार्शीमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद आहे तर करमाळा तालुक्यात सर्वात कमी पाऊस पडला आहे. बार्शीमध्ये                 ७३ मिमी तर करमाळा फक्त ३३.८३ मिमी पावसाची नोंद १३ आॅगस्टपर्यंत झाली आहे. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, माढा, मंगळवेढा या तालुक्यांमध्येही पावसाची स्थिती यंदा फारशी समाधानकारक नाही. तर बार्शीसह करमाळा, पंढरपूर आणि माळशिरस  या तालुक्यात बºयापैकी पाऊस  पडला आहे. 

डाळिंबाचे निम्म्यावर क्षेत्र तेल्याने बाधितजिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला आणि माळशिरस या तीन तालुक्यात मोठ्या प्रमाणावर डाळिंबाची लागवड झाली आहे. मात्र या तिन्ही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पंढरपूर तालुक्यात १० हजार १८५.५० हेक्टर क्षेत्रात डाळिंबाची लागवड आहे. त्यापैकी ६ हजार ९२२ हेक्टर क्षेत्र तेल्याने बाधित असल्याचा अहवाल आहे. सांगोला तालुक्यात १४ हजार ७८१ हेक्टर क्षेत्रावर डाळिंब असले तरी निम्मे म्हणजे ७ हजार ९४५.५० हेक्टर क्षेत्र तेल्या रोगाने ग्रासले आहे. माळशिरस तालुक्यात ६ हजार ७६० हेक्टरवरील डाळिंबापैकी ३ हजार ३६८ हेक्टर क्षेत्रावरील डाळिंबाचे पीक तेल्याच्या प्रभावाखाली आले आहे. हमखास नगदी उत्पन्नाचे हे पीक यंदा चांगले असले तरी तेल्या रोगामुळे शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. 

पेरणी क्षेत्र वाढले तरीही दुष्काळाचा धोकाजिल्ह्याचे सरासरी पेरणी क्षेत्र ८९ हजार हेक्टर आहे. मात्र यंदा मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली. अडीच पटीने क्षेत्र वाढले असून, १ लाख ९५ हजार ८२२ हेक्टरवर पेरणी झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. पेरणी क्षेत्राची ही टक्केवारी २४८ असल्याची विक्रमी नोंद यंदा प्रथमच कृषी विभागाने घेतली आहे. यात जूनमध्ये पेरणी झालेल्या मूग, उडीद, तसेच तूर, सोयाबिन, सूर्यफूल, भुईमूग या पिकांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. पेरणीचे क्षेत्र वाढूनही पाऊस पुरेसा नाही. त्यामुळे दुष्काळाचा धोका वाढला आहे. वेळेवर पाऊस न झाल्याने पिके वाया जाण्याची भीती  आतापासूनच शेतकºयांमध्ये व्यक्त होत आहे.

मूग, सोयाबीन, उडीदला माव्याने ग्रासलेमूग, उडीद आणि सोयाबीन या पिकांना सध्या मावा रोगाने ग्रासले आहे. या पिकांची पेरणी जून महिन्यात झाली होती. ही पिके सध्या फुलोºयावर असली तरी माव्याच्या प्रादुर्भावामुळे पिके धोक्यात आहेत. तूर, सोयाबिन, सूर्यफूल आणि भुईमूग ही पिके वाढीच्या मार्गावर असल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसFarmerशेतकरीSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय