साेलापूर अन् शिर्डी मतदारसंघ रिपाइंला हवा; आम्ही आमच्या चिन्हावर निवडणूक लढू - रामदास आठवले

By राकेश कदम | Published: February 25, 2024 01:10 PM2024-02-25T13:10:11+5:302024-02-25T13:10:28+5:30

तीनही वेळेला मी आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलाे. आमच्या पक्षाला जिथे उमेदवारी मिळेल तिथे आमच्या पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढली जावी असा आमचा आग्रह कायम आहे.

Solapur and Shirdi constituencies give for RPI; We will fight elections on our symbol - Ramdas Athvale | साेलापूर अन् शिर्डी मतदारसंघ रिपाइंला हवा; आम्ही आमच्या चिन्हावर निवडणूक लढू - रामदास आठवले

साेलापूर अन् शिर्डी मतदारसंघ रिपाइंला हवा; आम्ही आमच्या चिन्हावर निवडणूक लढू - रामदास आठवले

साेलापूर : महायुतीच्या जागा वाटपात शिर्डी आणि साेलापूर लाेकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला मिळायला हवा. आपण शिर्डीतून मतदारसंघात निवडणूक लढायला तयार आहे, असे रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

आठवले म्हणाले, राज्यातील दाेन मतदारसंघावर आमचा दावा आहे. साेलापुरात रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे निवडणूक लढायला तयार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  राष्ट्रवादीचे अजित पवार यांना त्यांच्या पक्षाचे चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार आहाेत. मी तीनवेळा लाेकसभेला निवडून आलाे. तीनही वेळेला मी आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलाे. आमच्या पक्षाला जिथे उमेदवारी मिळेल तिथे आमच्या पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढली जावी असा आमचा आग्रह कायम आहे.
दरम्यान, मंत्री रामदास आठवले यांचे साेलापुरात जंगी स्वागत करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता आठवले यांच्या उपस्थितीत संविधान सन्मान मेळावा हाेणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू हाेती.

Web Title: Solapur and Shirdi constituencies give for RPI; We will fight elections on our symbol - Ramdas Athvale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.