शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

"तू नवऱ्याची इज्जत करत नाही"; व्हिडीओ कॉल करुन मारहाण, शेवटी विवाहितेने स्वतःला संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 10:52 IST

सोलापुरात एका विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Solapur Crime: पुण्यात वैष्णवी हगवने या विवाहितेचे मृत्यू प्रकरण ताजे असतानाच सोलापूरातूनही तशीच बातमी समोर आली आहे. सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यात गाडी घेण्यासाठी आणि इतर खर्चासाठी माहेरवरून पैसे घेऊन ये, तुला नीट स्वयंपाक करता येत नाही, तू नवऱ्याची इज्जत करत नाही, असे म्हणून वारंवार होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळलेल्या एका विवाहितीने स्वतःला संपवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेने प्रेमविवाह केला होता आणि तिला तीन वर्षांची मुलगी आहे. दुसऱ्यांदा गर्भवती असतानाच महिलेने हे टोकाचं पाऊल उचललं. विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी पती पवन भोसले, सासू अलका भोसले व सासरा बलभीम भोसले यांच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहोळ येथील चिंचोलीकाटी औद्योगिक वसाहतीमधील आशा पवन भोसले या विवाहितेने राहत्या घरातील दरवाज्याच्या चौकटीला साडी बांधून गळफास घेतला. या घटनेची माहिती मयताची बहीण अंजूबाई पांडुरंग शिंदे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी सुरुवातीला 'अकस्मात मृत्यू'ची नोंद केली आहे. दरम्यान, मयत आशा भोसले यांच्या नातेवाईकांनी तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यानंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता.

त्रासामुळे आत्महत्या केल्याचा आरोप 

३ जून मंगळवारी दुपारी १२:४५ वा. च्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. पवन भोसले आणि आशाचे लग्न ५ नोव्हेंबर २०१९ रोजी झाले होते. एका घरगुती कार्यक्रमातून त्यांची ओळख झाली आणि नंतर त्यांचे प्रेमप्रकरण सुरु झाले, अशी माहिती पीडितेच्या नातेवाईकांनी दिली. आशाच्या मोठ्या बहिणीचे लग्न पवनच्या मोठ्या भावासोबत झाले होते. लग्नानंतर दोन वर्षे सर्व सुरळीत चालू होते, मात्र त्यानंतर पवनकडून वारंवार पैशांची मागणी होऊ लागली, असा आरोप आशाच्या पालकांनी केला. परिस्थिती नसल्याने आशाचे आई वडील त्याची मागणी पूर्ण करु शकत नव्हते. मात्र त्याच घरात मोठ्या मुलीचा संसार असल्याने आशाच्या वडिलांनी पैशाची तजवीज करुन पवन भोसलेला पाठवले.

त्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये वादातून आशाला पवन भोसले याने मारहाण करुन घरातून हाकलून दिले. त्यामुळे आशा मुलीसह माहेरी आली होती. पोलिसांनी समुपदेशन केल्यानंतर दोघांनी पुन्हा संसाराला सुरुवात केली. मात्र त्यानंतरही वारंवार त्रास सुरुच होता. आशाकडे पैशांची सातत्याने मागणी केली जात होती. पवनने दोन वेळा व्हिडीओ कॉल करुन आशाला मारहाण केली होती, असं आशाच्या आईने सांगितले. छळाला कंटाळून आशाने मंगळवारी दुपारच्या सुमारास गळफास घेवून जीवन संपवले.

नातेवाईकांच्या सांगण्यावरुन, आशा भोसले यांना त्रास दिला जात होता. तिच्याकडे वारंवार पैशीची मागणी केली जात होती, असा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला आहे. याशिवाय आशा भोसले यांच्या वडिलांनी ही आत्महत्या नसून तिचा जीव घेतल्याचा आरोप केला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीDomestic Violenceघरगुती हिंसा