शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

आधार कार्डामध्ये फेरफार करून मिळविले जातेय स्मार्ट कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 4:07 PM

सोलापूर एसटी बसमध्ये सवलत मिळविण्यासाठी फसवणूक;  दररोज पाठविले जातात २० बनावट कार्ड

ठळक मुद्देराज्य परिवहन महामंडळाकडून सवलतीचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्डाचे वाटपप्रत्येक दिवसात जवळपास २० ते ३० बनावट कार्डधारकांना कर्मचारी परत पाठवत आहेतसध्यातरी आधार कार्डावर फेरफार करणाºयांवर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही

रुपेश हेळवे

सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाकडून सवलतीचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्डाचे वाटप करण्यात येत आहे. पण हे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून ‘स्मार्ट डोके’ लढवत आधार कार्डावर फेरफार करून ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीचे स्मार्ट कार्ड काढण्याचा प्रयत्न होत आहे़ प्रत्येक दिवसात जवळपास २० ते ३० बनावट कार्डधारकांना कर्मचारी परत पाठवत आहेत़ सध्यातरी आधार कार्डावर फेरफार करणाºयांवर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही.

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने एसटीचे राज्यभर स्मार्ट कार्ड वाटप करण्याचे काम सुरू आहे़ हे कार्ड ज्येष्ठ नागरिक, स्वतंत्र्यसैनिक, अंध-अपंग, विद्यार्थी, मासिक/त्रैमासिक पासधारक, पत्रकार आदींना देण्यात येत आहे़ ज्येष्ठ नागरिकांना ४ हजार किलोमीटरपर्यंत अर्ध्या तिकीट दरात प्रवास करता येणार आहे़ यामुळे याचा लाभ घेण्यासाठी अनेक नागरिक आधार कार्डवर जन्मतारखेत फेरफार करत ज्येष्ठ नागरिकांच्या सवलती घेण्याचे प्रयत्न करत आहेत़ अशाप्रकारे फेरफार करणाºयांची संख्या वाढत असून दररोज जवळपास २० ते ३० नागरिकांना कर्मचारी परत पाठवत आहेत़ स्मार्ट कार्ड काढण्याच्या माध्यमातून छाननी प्रक्रिया सुरू आहे़ जर यामध्ये कोणी खोटी माहिती देत असेल तर त्यांना स्मार्ट कार्ड देण्यात येणार नाही़ पण अशाप्रकारे खोटे दस्तावेज दाखविणाºयांविरुद्ध कारवाई करण्याचे कोणतेही निर्देश अजूनपर्यंत आम्हाला प्राप्त नाहीत, असे विभागीय नियंत्रक  रमाकांत गायकवाड यांनी सांगितले.

अशाप्रकारे होते फेरफार- मूळ आधार कार्डावर जर जन्मतारीख ०१/०१/१९६८ असेल तर त्यात बदल करून अनेक नागरिक ०१/०६/१९५२ अशी तारीख असलेले बनावट कार्ड बनवून सादर करत आहेत़ अशा अनेक बाबी दररोज समोर येत आहेत. 

अशाप्रकारे होते ओळखपत्रांची तपासणी- स्मार्ट कार्ड देण्यासाठी एसटी महामंडळाकडून आधार कार्ड आणि मतदान कार्ड आणणे बंधनकारक असून आधार आणि मतदान ओळखपत्रातील माहिती तपासूनच स्मार्ट कार्ड देण्यात येत आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरST Strikeएसटी संपfraudधोकेबाजीDiwakar Raoteदिवाकर रावते