शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

आषाढीसाठी सहा रेल्वे गाड्या

By admin | Updated: July 3, 2014 01:13 IST

रेल्वेची वारकरी सेवा : १३ जुलैपर्यंत विविध सुविधा

सोलापूर : आषाढी यात्रेसाठी महाराष्ट्रासह परप्रांतातून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने १३ जुलैपर्यंत सहा गाड्या धावणार असून, यात्रा कालावधीत वारकऱ्यांना संरक्षण देण्याबरोबर त्यांना विविध सुविधा देणार असल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक जॉन थॉमस यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत सांगितले.यंदा प्रथमच वारकऱ्यांसाठी अमरावती-खामगाव-पंढरपूर, मिरज-उस्मानाबाद, दौंड-पंढरपूर आणि लातूर-पंढरपूर या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. अमरावती-पंढरपूर ही गाडी (क्रमांक- ०१२०१) ३ त ७ जुलै या कालावधीत अमरावती स्थानकावरून दुपारी २ वाजता सुटणार असून, तेथून ती बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड, भिगवणमार्गे करमाळा तालुक्यातील जेऊर स्थानकावर सायंकाळी ६ वाजून ३८ मि. तर कुर्डूवाडीत तिचे रात्री साडेसात वाजता आगमन होणार आहे. पंढरपुरात ती रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी दाखल होणार आहे. ही गाडी पंढरपूर स्थानकावरून सायं. ४ वाजता सुटणार आहे. या गाडीमुळे विदर्भातील वारकऱ्यांची सोय होणार आहे. याशिवाय आषाढी यात्रेसाठी पंढरीत दाखल झालेल्या वारकऱ्यांसाठी जादा तिकीट खिडक्या उघडण्यात येणार असून, शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी जादा आरपीएफ जवानांची नियुक्ती केली असून, वरिष्ठ अधिकारी यात्रेतील गर्दीवर लक्ष ठेवणार आहेत. पत्रकार परिषदेत एडीआरएम के. मधुसुदन, वरिष्ठ विभागीय परिचालन प्रबंधक नरपतसिंग, सहायक वाणिज्य व्यवस्थापक आय. भास्करराव, जनसंपर्क अधिकारी अनिलकुमार वालदे आदी उपस्थित होते. ----------------------------लातूर-पंढरपूर-लातूर विशेष पॅसेंजर गाडीलातूर-पंढरपूर-लातूर विशेष पॅसेंजर गाडी ३ ते १२ जुलैपर्यंत धावणार.लातूर स्थानकावरून तिचे दररोज सकाळी साडेसात वाजता प्रस्थान.औसा, ढोकी, कळंब, येडशीमार्गे उस्मानाबादेत सकाळी ९.२५ वा. आगमन.बार्शीत सकाळी १०.१२ वा., कुर्डूवाडीत १०.५५ वा. तर पंढरपुरात सकाळी ११.५० वा. आगमन.हीच गाडी पंढरपूरहून दुपारी २ वाजता सुटून लातूरला सायं. ७ वाजता पोहोचणार आहे. -------------------------------पंढरपूर-कुर्डूवाडी-पंढरपूर विशेष पॅसेंजर४४ ते १३ जुलैपर्यंत दररोज धावणार४पंढरपूर स्थानकावरून सकाळी १०.३५ वा. प्रस्थान. मोडनिंबला ११.०२ वा. तर कुर्डूवाडीला ११.२५ वा. आगमन. ४कुर्डूवाडीहून दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी प्रस्थान. मोडनिंबला पावणेचारला आगमन, पंढरपूर स्थानकावर तिचे सायं. ४ वाजून २५ मिनिटांनी आगमन. ------------------------------------मिरज-उस्मानाबाद-मिरज गाडीमिरज-उस्मानाबाद :३ ते १२ जुलैपर्यंत धावणारमिरज स्थानकावरून सुटणार रात्री ७ वाजून ४० मिनिटांनीसांगोल्यात तिचे रात्री पावणेनऊ वाजता आगमनरात्री ११.२० वाजता पंढरपुरात दाखल. मोडनिंब, कुर्डूवाडी, बार्शीमार्गे उस्मानाबाद स्थानकावर रात्री १.०५ मिनिटांनी दाखल.उस्मानाबाद-मिरज :दुपारी ३.४० वाजता उस्मानाबादेतून प्रस्थान. पंढरपुरात सायं. ६.५० वा. आगमन, ७.१० वा. प्रस्थान.सांगोल्यात ७.३३ तर मिरजमध्ये रात्री ९.२० वाजता दाखल------------------------------------१३ जुलैपर्यंत दौंड-पंढरपूर-दौंडदौंडवरून सायं. ४.०५ वा. प्रस्थान. भिगवण, पारेवाडी, केममार्गे कुर्डूवाडीत सायं. ६.१० वाजता आगमन. मोडनिंबमध्ये ७.१२ वा. तर पंढरपूर स्थानकावर रात्री ८.३० वा. आगमन. हीच गाडी १६ ते २३ जुलैपर्यंत दररोज दौंड स्थानकावरून दुपारी १.३५ वा. सुटणार आहे. पंढरपुरात तिचे सायंकाळी पावणेसहा वाजता आगमन होणार आहे.