सिद्धेश्वर चरणी दीपोत्सव; दिवाळी पाडव्यानिमित्त हजारो दिव्यांनी मंदिर परिसर तेजोमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2021 21:41 IST2021-11-05T21:40:31+5:302021-11-05T21:41:02+5:30

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे श्री क्षेत्र माचणूर (ता मंगळवेढा)  येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात दीपावली पाडव्याचे औचित्य साधून दीपोत्सव साजरा करण्यात आला. ...

Siddheshwar Charani Dipotsav; Thousands of lamps lit up the temple premises on the occasion of Diwali Padva | सिद्धेश्वर चरणी दीपोत्सव; दिवाळी पाडव्यानिमित्त हजारो दिव्यांनी मंदिर परिसर तेजोमय

सिद्धेश्वर चरणी दीपोत्सव; दिवाळी पाडव्यानिमित्त हजारो दिव्यांनी मंदिर परिसर तेजोमय

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे

श्री क्षेत्र माचणूर (ता मंगळवेढा)  येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात दीपावली पाडव्याचे औचित्य साधून दीपोत्सव साजरा करण्यात आला. आकर्षक दिव्यांची रोषणाई, प्रसन्न करणाऱ्या पूजाअर्चेने ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर देवस्थानचा परिसर उजळून गेला .हजारो  दिव्यांनी मंदिर परिसर तेजोमय झाला होता.


 कोरोना महामारीमुळे देशातील स्थिती बदलली असून सामान्य नागरिकांच्या व्यवसायांवर मोठा परिणाम झाला होता. मंदिरे सुरू झाल्यामुळे आता स्थिती पूर्वपदावर  आली आहे. मंदिरे गर्दीने फुलून जात आहेत. दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून श्री  सिद्धेश्वर चरणी
दीपोत्सवची सेवा  पांडुरंग देशमुखे ,गजानन पुजारी, विद्यानंद पुजारी, उदय पाटील, सागर पुजारी यांनी अर्पण केली. सिद्धेश्वर मंदिर परिसर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला होता.


कोरोनामुक्त जगासाठी या वेळी प्रार्थना करण्यात आली. कोरोनामुळे पसरलेला अंधःकार दूर व्हावा, अशी प्रार्थना आम्ही केल्याचे भाविक पांडुरंग देशमुखे  यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. 

Web Title: Siddheshwar Charani Dipotsav; Thousands of lamps lit up the temple premises on the occasion of Diwali Padva