धक्कादायक; प्रशासकीय बदली झाली अन् कायमच्या निरोपाची वाईट वेळ आली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 12:35 IST2020-09-13T09:46:23+5:302020-09-13T12:35:00+5:30
माढा तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्याचे अपघाती निधन

धक्कादायक; प्रशासकीय बदली झाली अन् कायमच्या निरोपाची वाईट वेळ आली
माढा : माढा तालुक्यातील दारफळ सिना येथील महेश आधटराव या पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री बाराच्या सुमारास घटल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे कर्तव्यावर असलेल्या महेश यांची बदली प्रशासकीय बदली गेवराई येथे झाल्याने नेकनूर पोलीस ठाण्यात निरोपाचा कार्यक्रम झाला, त्यानंतर ते एम एच २३ एसएस ६००४) या स्विफ्ट कारने घराकडे जात असताना खजाना विहीर परिसरात कारवरील ताबा सुटल्याने कार डिव्हायडरवरून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला नदीत कोसळली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
दरम्यान, घटनास्थळी ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित बडे पोहे जयसिंग वाघे आदींनी धाव घेतली होती. त्यांच्या पश्चात पत्नी आई वडील मुलगा, मुलगी भाऊ असा मोठा परिवार आहे.