धक्कादायक; सोलापूर पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास भोसले यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 14:13 IST2021-08-11T14:12:26+5:302021-08-11T14:13:10+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Shocking; Suhas Bhosale, Assistant Commissioner of Police, Solapur Police, passed away | धक्कादायक; सोलापूर पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास भोसले यांचे निधन

धक्कादायक; सोलापूर पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास भोसले यांचे निधन

सोलापूर - पोलिस आयुक्तालयातील सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास भोसले यांचा बुधवारी सकाळी सातच्या सुमारास जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला. ते 56 वर्षांचे होते. 


सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास भोसले हे आज बुधवारी सकाळी जिममध्ये व्यायाम करीत होते. सुरवातीला ते चक्कर येऊन खाली पडले. त्यानंतरही त्यांनी व्यायाम चालू ठेवला आणि दुसऱ्यांदा त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यावेळी तेथील जिम ट्रेनरने त्यांच्या छातीला थोडा पंपिंग करण्याचा प्रयत्न केला आणि लगेच सर्वांना एकत्रित करून सुहास भोसले यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी गाडीत बसवले अन्‌ हॉस्पिटलला पाठवले. परंतु उपचार सुरू असतानाचा त्यांचा दुदैवी मृत्यू झाला.

Web Title: Shocking; Suhas Bhosale, Assistant Commissioner of Police, Solapur Police, passed away