शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

धक्कादायक; इंदापूरमधील नदीपात्रात आढळले टाकळीतील युवकाचे धडावेगळे शिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 3:30 PM

लोकमत न्यूज नेटवर्क

टेंभुर्णी : माढा तालुक्यात कोंढार भागातील टाकळी येथून १७ जानेवारी रोजी बेपत्ता झालेल्या एका युवकाचे धडावेगळे झालेले शिर  इंदापूर तालुक्यात गणेशवाडी जवळील भीमा नदीपात्रात आढळले.संजय गोरवे (वय २३) असे त्या युवकाचे नाव असून २० जानेवारी रोजी धडावेगळे शीर आढळून आले.

 इंदापूर पोलिसांच्या मते संजय गोरवेंचास खून हा अनैतीक सबंधातून झाला असण्याची शक्यता वर्तवली असून याप्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे विकी उर्फ व्येंकटेश विजय भोसले व महेश प्रभाकर सोनवणे (दोघे रा. टाकळी ता. माढा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. संजय गोरवेचा मृतदेह मिळाल्यानंतर अवघ्या सहा तासात या प्रकरणाचा छडा लावण्यात आणि आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

त्यांना इंदापूर न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती इंदापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी दिली. १७ जानेवारी रोजी मयत संजय गोरवे हा बेपत्ता झाला होता.दुस-या दिवशी त्याच्या नातलगांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची खबर दिली होती. २० जानेवारीला सकाळी ७ वाजता गारअकोले ते गणेशवाडी या गावांना जोडणाऱ्या भीमा नदीवरील पुलाखाली नदीपात्रात शीर व हात-पाय धडावेगळे केलेल्या अवस्थेत अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. इंदापूरचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी तपास पथक नेमूण चक्रे वेगाने फिरवली. या कारवाईत पोलीस कर्मचारी दाजी देठे, हवालदार के.बी.शिंदे, पोलीस नाईक जगदीश चौधर,पोलीस शिपाई एस.जी.नगरे, अमोल गायकवाड, आरिफ सय्यद गुन्ह्याच्या शोध कार्यात सहभाग नोंदवला.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीMurderखूनIndapurइंदापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस