शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
2
“वाह फडणवीस वाह, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार”
3
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
5
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
6
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
7
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
8
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
9
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
10
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
12
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
13
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
14
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
15
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
16
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
17
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
18
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
19
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
20
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण

धक्कादायक; शालेय पोषण आहारातल्या चवळीत निघाले भुंगे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 13:01 IST

निकृष्ट कसा द्यायचा: शिक्षक  झाले त्रस्त, आहार नियोजनावर परिणाम

ठळक मुद्देपंढरपूर तालुक्यात गत महिन्यापासून पुरवठा करण्यात येत असलेली चवळी ही निकृष्ट दर्जाचीपुरवठा करण्यात आलेल्या चवळीत भुंगे आढळून आले प्रत्यक्षात चवळी खराब झालेली आहे, यामुळे शिक्षकांची डोकेदुखी वाढली

पंढरपूर :  शालेय भोषण आहारात शासनाकडून देण्यात येत असलेल्या दाळी तसेच कडधान्यामध्ये चवळी ही निकृष्ट दर्जाची पुरवली जात  असल्याचे समोर येत आहे. भुंगे लागलेले असल्याने ती खराब होत असून, वापरण्यायोग राहिलेली नाही. तालुक्यात थोड्याफार फरकाने ही स्थिती असल्याचे समोर येत  आहे. 

शासनाकडून कोणताही मुलगा कुपोषित राहू नये, शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पट वाढावा यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरू केली आहे. या योजनेचा सर्व मुलांना फायदा होत आहे. पोषण आहारात चवळी, मसूर, तूर यासह भाताचा समावेश आहे. मे महिन्यापासून मटकी डाळ बंद करण्यात आली आहे. 

पंढरपूर तालुक्यात गत महिन्यापासून पुरवठा करण्यात येत असलेली चवळी ही निकृष्ट दर्जाची असल्याचे समोर येत आहे. पुरवठा करण्यात आलेल्या चवळीत भुंगे आढळून आले आहेत. त्यामुळे चवळी खराब होऊन आहारात वापरण्यायोग्य राहिलेली नाही. आठवड्यातून तीन दिवस चवळीचा आहार देण्याची सूचना देण्यात येत असताना, प्रत्यक्षात चवळी खराब झालेली आहे. यामुळे शिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे. चवळी ऐवजी इतर दाळींचा वापर हा पोषण आहारात करावा लागत आहे. 

शासनाकडून आलेले पोषण आहार धान्य हे सुस्थितीत राहावे यासाठी प्रत्येक शाळेकडून सोय केली जात आहे. दोन महिन्यात एकदा धान्याचा पुरवठा केला जातो. गत महिन्यात पुरवठा करण्यात आलेल्या धान्यामध्ये चवळी वगळता इतर धान्य चांगल्या दर्जाचे आहे. चवळीत ही निकृष्ट असल्याने त्यामध्ये भुंगे लागल्याचे समोर येत आहे. 

तत्काळ कारवाई- शिक्षण विस्तार अधिकाºयांमार्फत पोषण आहारात देण्यात येणाºया चवळी तसेच इतर धान्याची तपासणी करण्यात येईल. चवळीमध्ये सर्वाधिक प्रोटिन्स असतात. पुरवठादाराकडून निकृष्ट दर्जाची चवळी  देण्यात येत असल्यास त्यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी दिली. 

गत महिन्यात पुरवठा करण्यात आलेल्या चवळीत भुंगे आढळून आले. ती आहारात वापरणे कठीण बनले आहे. धान्य ठेवण्याच्या ठिकाणी  स्वच्छता असतानाही असा प्रकार घडत आहे. यामुळे आहार नियोजनावर परिणाम होत आहे. - आर. आर. भालेराव, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, वाखरी

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा