धक्कादायक; उजनी जलाशयातील पाण्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 08:14 IST2020-06-19T08:10:40+5:302020-06-19T08:14:21+5:30

मासेमारी करणाऱ्यांनी दिली पोलीस पाटलाला खबर; करमाळा पोलीस घटनास्थळी दाखल

Shocking; The body of a stranger was found in the water of Ujani reservoir | धक्कादायक; उजनी जलाशयातील पाण्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

धक्कादायक; उजनी जलाशयातील पाण्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

ठळक मुद्देकरमाळा पोलिसांनी केला पंचनामामासेमारी करणाऱ्यांनी काढला मृतदेह पाण्याबाहेरकरमाळा पोलीस घटनास्थळी दाखल

कोर्टी :  केतूर ( ता करमाळा ) येथे उजनी जलाशयाच्या पात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह ( वय अंदाजे ३५ ते ४०)  पाण्यावर तरंगत असल्याचे मासेमारी करणाऱ्याना सकाळी दिसले. त्यांनी ही खबर केतूरचे पोलीस पाटील गणपत पाटील यांना दिली. त्यानंतर सदरची खबर पोलीस पाटील यांनी करमाळा पोलीस ठाण्याला दिली.


केतूर येथील उदयसिंह मोरे पाटील याच्या शेताजवळच असलेल्या पाण्यामध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह तरंगत असल्याचे पोलीस पाटील गणपत पाटील यांनी ठाण्याला कळवले. त्यानुसार करमाळा पोलिसांनी सदरचा मृतदेह पाण्याबाहेर काढून त्याचा पंचनामा केला.  सदरचा अनोळखी इसमाचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असावा असे त्यांनी सांगितले.

याबाबत पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे तपास करत असून अनोळखी इसमाचा मृतदेह बाबत कोणाला काही माहिती असल्यास करमाळा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Shocking; The body of a stranger was found in the water of Ujani reservoir