धक्कादायक; भरधाव टेम्पोने पोलिसाला चिरडले; वरवडे टोलनाक्याजवळ पोलिसाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 19:22 IST2020-12-06T19:21:34+5:302020-12-06T19:22:15+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

धक्कादायक; भरधाव टेम्पोने पोलिसाला चिरडले; वरवडे टोलनाक्याजवळ पोलिसाचा मृत्यू
टेंभुर्णी : पुणे-सोलापूर महामार्गावरील वरवडे येथील टोलनाक्याजवळ वाहन तपासणी करीत असताना मद्यधुंद कंटेनर चालकाने तपासणीसाठी थांबलेल्या सागर चोबे (वय ३३, राहणार बार्शी ) या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावरच कंटेनर घातल्याने चोबे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली आहे.
मयत सागर चौबे हे मोडनिंब येथील महामार्ग सुरक्षा पथकात कार्यरत होते. कर्तव्य बजावत असताना हा अपघात घडला आहे. शवविच्छेदनासाठी सागर चोबे यांचा मृतदेह टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. सागर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे.