साेलापूर दाैऱ्यापूर्वी शरद पवार गटाला धक्का, माजी नगरसेवकांनी घेतली अजितदादांची भेट
By राकेश कदम | Updated: January 16, 2024 17:20 IST2024-01-16T17:18:51+5:302024-01-16T17:20:21+5:30
लवकरच प्रवेश कार्यक्रम हाेणार असल्याचा दावा.

साेलापूर दाैऱ्यापूर्वी शरद पवार गटाला धक्का, माजी नगरसेवकांनी घेतली अजितदादांची भेट
राकेश कदम, साेलापूर : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार २० जानेवारी राेजी साेलापुरात येत आहेत. तत्पूर्वीच पवार गटातील माजी नगरसेवकांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. हे माजी नगरसेवक लवकरच अजितदादा गटात प्रवेश करतील, असे संकेत प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात एमआयएमला साेडचिठ्ठी देउन माजी नगरसेवक ताैफिक शेख यांच्यासह सहा जणांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला हाेता. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर ही मंडळी शरद पवार यांच्या बाजूने उभी राहिली हाेती. मात्र मंगळवारी ताैफिक शेख यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे नेते, तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निकटवर्तीय असलेले आनंद चंदनशिवे यांनीही मंगळवारी अजितदादांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या साेलापूर दाैऱ्यात यांचा दादा गटात प्रवेश हाेईल, असे संकेत दादा गटाच्या नेत्यांनी दिले. या भेटीवेळी शहराध्यक्ष संताेष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, महापालिकेचे माजी सभापती गणेश पुजारी आदी उपस्थित हाेते.