सरसकट कर्जमाफीसाठी शिवसेना आग्रही - आदित्य ठाकरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 12:17 IST2019-06-09T12:04:11+5:302019-06-09T12:17:46+5:30

सोलापुरात बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद मोहिमेचा शुभारंभ 

Shiv Sena advocates for overall debt relief - Aditya Thackeray | सरसकट कर्जमाफीसाठी शिवसेना आग्रही - आदित्य ठाकरे 

सरसकट कर्जमाफीसाठी शिवसेना आग्रही - आदित्य ठाकरे 

ठळक मुद्देआदित्य ठाकरे सोलापूर दौर्‍यावरदुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी ठाकरे सोलापुरातचारा छावण्यांना देणार भेटी

सोलापूर - दुष्काळाच्या प्रश्नात कुणीही राजकारण करु नये. शिवसेना सरसकट कर्जमाफी आग्रही आहे, असे युवा सेनेचे राष्ट्रीय प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रविवारी सांगितले. 

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने शेतकºयांसाठी राबविण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद मोहिमेचा शुभारंभ रविवारी सोलापुरात करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले, युतीच्या पहिल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेने कर्जमाफीबद्दलचे धोरण स्पष्ट केले होते. सध्या जी कर्जमाफी झाली आहे त्यातही काहीजण राहिले आहेत. त्यात काही तांत्रिक बाबी सोडविण्यात येत आहे. कुणी एकमेकांवर टीका न करता दुष्काळाच्या प्रश्नावर काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Shiv Sena advocates for overall debt relief - Aditya Thackeray