हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
By आप्पासाहेब पाटील | Updated: April 23, 2025 00:11 IST2025-04-23T00:10:40+5:302025-04-23T00:11:14+5:30
दरम्यान, सोलापूर शहर पोलिसांनी सांगितले की, आत्महत्या केलेली मुलगी ही अकरावी सायन्समध्ये शिकत होती. ती उत्तर सोलापूर तालुक्यातील रहिवासी आहे. आत्महत्या पूर्वी त्या मुलीने चिठ्ठी लिहिली असून चिट्टीमध्ये माझ्या आत्महत्येला कोणासही जबाबदार धरू नये असे लिहिले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
सोलापूर : सोलापुरातील एका नामवंत महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये एका अल्पवयीन मुलीने फाशी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी महाविद्यालयासमोर आक्रोश करीत रास्ता रोको आंदोलन सुरू केले.
दरम्यान, सोलापूर शहर पोलिसांनी सांगितले की, आत्महत्या केलेली मुलगी ही अकरावी सायन्समध्ये शिकत होती. ती उत्तर सोलापूर तालुक्यातील रहिवासी आहे. आत्महत्या पूर्वी त्या मुलीने चिठ्ठी लिहिली असून चिट्टीमध्ये माझ्या आत्महत्येला कोणासही जबाबदार धरू नये असे लिहिले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना घटनास्थळाला भेट दिली, आंदोलन करत असलेल्या नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.
दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी याच महाविद्यालयात एका मुलाने दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता मुलीने होस्टेलमध्ये आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.