शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

गोजिरवाण्या घरात लाजिरवाण्या मालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 7:47 AM

स्वत:ही आणि आपल्या पाल्यांना टीव्हीचं हे व्यसन लागू देऊ नका, वेळीच आवरा हेच तुमच्या आमच्या भल्याचं आहे.

एक  जाहिरात, ‘डिस्ने किड्स पॅक’ची़ ७-८ वर्षांची मुलगी. आई तिला तिच्या मैत्रिणीबद्दल विचारते तर छोटी मोठ्या अविर्भावात म्हणते, ‘क्या समझ रख्खा है उसने मुझे ? मेरे खिलाफ षड्यंत्र रच रही है । मै उसका बदला जरुर लँुगी । वो मेरे पंजेसे बच नही सकती ।’ ही तिची वाक्ये, बोलण्याची ढब पाहून आई थक्क होते. त्यावर भाष्य येते, ‘बडों की सीरियल बच्चे देखेंगे तो क्या सिखेंगे ।’ यात सास-बहु टाईपच्या सीरियलचा दुष्परिणाम नेमकेपणाने दाखविलेला.

आज टी. व्ही. सीरियल लोकांच्या जगण्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. पण बहुसंख्य मालिका परिवाराने एकत्रित बसून बघाव्या अशा असतात, असे फारसे कोणी म्हणणार नाही. केवळ टी. आर. पी. वाढविण्याच्या मागे असलेल्या अशा मालिकांचे सुरुवातीचे कथानक, विषय नंतर कधी, कसे अचानक वळण घेईल, याचा पत्ता लागत नाही. त्यातील पात्रांचे वर्तन, वेशभूषा आणि वय अचानक आमूलाग्र बदललेले केव्हा दिसेल हेही सांगता येत नाही. 

विवाहबाह्य संबंध, पारिवारिक षड्यंत्र यासारख्या मसाल्यांनी या मालिका ठासून भरलेल्या असतात. शह-काटशह यांच्यात परिवारातील सदस्य गुंतलेले दिसतात. उपजीविकेसाठी काम करत असलेले फारसे कधी त्यांना दाखवत नाहीत. पैसा, स्वार्थ यांच्यापुढे नातेसंबंध, किमान नैतिक मूल्ये यांचे महत्त्व त्यांच्या लेखी नसते. स्त्रीत्व, तिचा सन्मान यांचा पुरेपूर अवमान पुरुषांबरोबर स्त्री पात्रेही करताना दाखविली जातात. बहुसंख्य हिंदी मालिका तर वास्तवापासून कोसो दूरच असतात. अतिश्रीमंत परिवार, त्यात नखशिखांत दागदागिने, विचित्र पेहराव असलेली स्त्री पात्रे. हे अवास्तव चित्रण. पण प्रेक्षकही ते चवीने पाहतात म्हणून ‘मागणी तसा पुरवठा’ या न्यायाने अशा मालिकांची निर्मिती होत राहते.

ऐतिहासिक विषयांच्या मालिकांमध्ये तर कधी रंजकता वाढवण्यासाठी तर कधी सामाजिक घटकांना खूष करण्यासाठी नको त्या ऐतिहासिक पात्रांचे उदात्तीकरण केलेले दिसते. तर कधी चांगली चांगली चरित्रे थोडक्यात आटोपती घेतलेली दिसतात. ज्यांचा इतिहासाचा फारसा अभ्यास नाही असे प्रेक्षक मग सीरियलमधील इतिहासच खरा मानू लागतात. त्यामुळे अशी ऐतिहासिक तथ्ये गैरसमजाच्या भोवºयात सापडतात. बहुसंख्य प्रेक्षक वर्ग महिला व मुले असल्याने अशा अतिरंजित मालिकांमुळे त्यांच्या भावनिक, वैचारिक स्वास्थ्यावर विपरित परिणाम होतो. याला अपवाद असलेली एखादी मालिका अधूनमधून क्वचितच दिसते.पुरुष मंडळींच्या आवडत्या असणाºया वृत्तवाहिन्यांवरील चर्चा-महाचर्चा, त्यांचे विषय, त्यात आमंत्रित नेते, अभ्यासक, प्रतिनिधी हा संशोधनाचा विषय आहे. कित्येकदा आपण चर्चा पाहतोय, की भांडण असा प्रश्न पडतो.

डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफीसारख्या वाहिन्या ज्ञानवर्धनाचे काम करताना दिसतात. पण त्यांचा प्रेक्षक वर्ग कमी. मुलांसाठी असलेल्या कार्टुन वाहिन्या पाहण्याचे व्यसन मुलांना लागू नये याची काळजी घेणेही गरजेचे आहे. शेवटी टी. व्ही. चा योग्य रितीने योग्य प्रमाणात वापर झाला तर ते मनोरंजनाचे, ज्ञानवर्धनाचे साधन बनू शकते, नाही तर ते व्यसन बनते. सास-बहू टाईपच्या मालिका पाहून तर वाटते की गोजिरवाण्या घरात अशा लाजिरवाण्या टी. व्ही. मालिका नकोच. असं प्रामाणिकपणे वाटते. सांगण्याचं तात्पर्य असं की, वाहिन्यांवर काय दाखवावं हा ज्याचा त्यांचा प्रश्न असला तरी त्या पाहयच्या की नाही हे तर आपल्या हातात आहे ना! म्हणून प्रामाणिकपणे सांगावेसे वाटते, स्वत:ही आणि आपल्या पाल्यांना टीव्हीचं हे व्यसन लागू देऊ नका, वेळीच आवरा हेच तुमच्या आमच्या भल्याचं आहे असं आवर्जून नमूद करावेसे वाटते. - डॉ. छाया कुलकर्णी,(लेखिका झेडपी शाळेत शिक्षिका आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरTV Celebritiesटिव्ही कलाकारEducationशिक्षण