शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे यांच्या जात प्रमाणपत्राच्या वादावर पडदा

By admin | Updated: July 2, 2014 00:37 IST

शिंदे यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राला आक्षेप

सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राला आक्षेप घेणाऱ्या याचिकेची आज सुनावणी झाली. हरकतदारांनीही नरमाईची भूमिका घेतल्याने आता त्यावर पडदा पडला आहे.लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे आणि खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या जात पडताळणी प्रमाणपत्राला रिपाइं नेते प्रमोद गायकवाड यांनी आक्षेप घेतला होता. शिंदे यांना प्रमाणपत्र देताना रितसर सुनावणी घेतली नाही. कारणमीमांसा आदेश काढला नाही. दक्षता पथकाकडून अर्जाची छाननी नाही, असे तांत्रिक मुद्दे उपस्थित करून हरकत घेण्यात आली होती. न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी घेण्याचे आदेश जात पडताळणी समितीला दिले होते.सुशीलकुमार शिंदे यांच्या वतीने अ‍ॅड. सतीश माने-शिंदे यांनी २८ मार्च रोजी बाजू मांडली होती. न्यायालयाने प्रमाणपत्राची खातरजमा करण्यासाठी जात पडताळणी कार्यालयाकडे प्रकरण पाठविले होते. दक्षता पथकाने चौकशी करून अहवाल सादर केला. त्यानंतर आज सुनावणी घेण्यात आली. शिंदे प्रमाणपत्राला नाहीत तर ते देण्याच्या प्रक्रियेला हरकत होती, असा युक्तिवाद करण्यात आला होता.विभागीय जाती प्रमाणपत्र समितीचे अध्यक्ष शरद अहिरे, उपायुक्त तथा समितीचे सदस्य पी. एस. कवठे आणि संशोधन अधिकारी बाबासाहेब अरवत यांच्या त्रिसदस्यीय समितीसमोर आज अर्जाची सुनावणी झाली. दक्षता पथकाचा अहवाल सादर करण्यात आला. प्रमोद गायकवाड यावेळी हजर होते; मात्र त्यांनी याबाबत सहमती दर्शविली; तर अ‍ॅड. बनसोडे सुनावणीलाच उपस्थित नव्हते. शिंदे यांच्या वतीने अ‍ॅड. कल्याणराव हिप्परगी उपस्थित होते.