शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

निंभोरेतील शाळा १९४२ सालातील; वर्गखोल्या झाल्या धोकादायक, जीव मुठीत घेऊन शिकतात विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 3:10 PM

नासीर कबीर   करमाळा : निंभोरे येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या धोक ादायक बनल्या आहेत. विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण ...

ठळक मुद्देझेडपीची मंजुरी मिळूनही नव्या इमारतीच्या कामाला विलंबखोल्या पाडण्याचा अहवाल वर्षापूर्वीच देऊनसुध्दा अंमलबजावणी न झाल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

नासीर कबीर  

करमाळा : निंभोरे येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या धोक ादायक बनल्या आहेत. विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. जि.प.च्या बांधकाम विभागाने मोडकळीस आलेल्या खोल्या पाडण्याचा अहवाल वर्षापूर्वीच देऊनसुध्दा अंमलबजावणी न झाल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे.

करमाळा तालुक्यातील निंभोरे येथील जिल्हा परिषद शाळेस एकूण ९ वर्गखोल्या असून, इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहेत. शाळेची पटसंख्या १२२ आहे. वर्गखोल्या क्रमांक एक व ४ स्वातंत्र्यपूर्व काळातील १९४२-४३ सालातील आहेत. दगड, माती, कौलारू खोल्या अत्यंत धोकादायक बनल्या आहेत. खोेली क्र. दोन व तीनमध्ये विद्यार्थीशिक्षण घेतात.

या खोल्यांच्या भिंतींना भेगा पडल्या असून, भिंती फुगल्या आहेत. वर्गखोल्यांवरील कौले, लाकूड, पत्रे, आरसीसी स्लॅब, बीम, लिंटेल खराब झाले आहेत. पावसाळ्यात खोल्या गळतात. या संदर्भात शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत यांनी ठराव करून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना गेल्या दोन वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र अद्यापही दखल न घेलयने गावकºयांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

खोल्यांमध्ये माती पडते- वर्गखोल्या एवढ्या धोकादायक झाल्या आहेत की, छतावरील माती नेहमीच पडत असते. स्लॅबवर गिलावा केलेले ढपले पडणे नित्याचेच झाले आहे. धोकादायक खोल्यांमध्ये लोकसभा, विधानसभासह प्रत्येक निवडणुकीचे मतदान केंद्र उभारले जाते. विद्यार्थी रोजच या शाळेत बसून शिक्षण घेतात. सुदैवाने अद्याप तरी कोणतीही दुर्घटना घडलेली नाही.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदSchoolशाळाEducationशिक्षणStudentविद्यार्थी