अक्कलकोट तालुक्यात शाळकरी मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 14:05 IST2019-07-26T14:04:29+5:302019-07-26T14:05:34+5:30

उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; दोघांना पोलीसांनी केली अटक

School girl abused in Akalkot taluka | अक्कलकोट तालुक्यात शाळकरी मुलीवर अत्याचार

अक्कलकोट तालुक्यात शाळकरी मुलीवर अत्याचार

ठळक मुद्दे- मोबाईलवरून दिली शाळकरी मुलीने पोलीसांना माहिती- अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- पोलीसांनी दोघां तरूणांना घेतले ताब्यात

सोलापूर  : अक्कलकोट तालुक्यात तेरा वर्षाच्या शाळकरी मुलीवर दोन तरुणांनी अत्याचार केल्याची फिर्याद स्वत: मुलीनेच पोलिसांकडे केली आहे़ याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.

ही शाळकरी मुलगी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेला जात असताना पाठीमागून दुचाकीवर दोन तरुण आले, त्यांनी तुला वडिलांनी घरी बोलावले आहे असे सांगितल़े़ दोन्ही तरुण परिचयाच्या असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला. दुचाकीवर बसवून घरी नेण्याचा बहाणा करीत त्यांनी ही दुचाकी एका शेताकडे वळवली आणि तिच्यावर अत्याचार केला अशी तक्रार या मुलीने मोबाईलवरून पोलिसांना दिली़
याप्रकरणाची दखल घेत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात  रात्री उशिराने गुन्हा दाखल करून घेण्यात आला. पोलिसांनी तातडीने हालचाल करीत संबंधित दोन संशयितांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले.




 

Web Title: School girl abused in Akalkot taluka