शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

मोहोळमधील जिल्हा परिषदेच्या शाळेनं दिलं शौचालयाला एसटी बसचं रुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 10:46 AM

सोलापूर : स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धेंंतर्गत सोलापूर जिल्ह्यात शालेय, अंगणवाडी आणि वैयक्तिक शौचालय कल्पकतेने रंगवून त्यावर स्वच्छतेचे संदेश देण्याचे ...

ठळक मुद्देवैयक्तिक शौचालय कल्पकतेने रंगवून त्यावर स्वच्छतेचे संदेश देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धेत उत्कृष्ट काम करणाºया ग्रामसेवकांचा जिल्हास्तरावर २८ जानेवारी रोजी सन्मान३१ जानेवारीपर्यंत देशात स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे

सोलापूर : स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धेंंतर्गत सोलापूर जिल्ह्यात शालेय, अंगणवाडी आणि वैयक्तिक शौचालय कल्पकतेने रंगवून त्यावर स्वच्छतेचे संदेश देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मोहोळ येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ मधील शौचालयास रंगरंगोटीत एसटी बसचा आकार देण्यात आला असून, स्वच्छता एक्स्प्रेस असे नामकरण करण्यात आले आहे. 

 केंद्र शासनाच्या पेयजल विभागाच्या वतीने ३१ जानेवारीपर्यंत देशात स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अभियानाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शौचालयावर रंगरंगोटी करून त्यावर शौचालय वापरण्याबाबतचे महत्त्व पटविणारी विविध चित्रे काढण्यात येत आहेत. यामध्ये प्लास्टिक बंदी , शौचालयाचा वापर, पिण्याच्या पाण्याचे महत्त्व, पाणी गुणवत्ता, लहान मुलांना आकर्षित करणाºया चित्रांचा समावेश करण्यात आला आहे.

पंढरपूर तालुक्यातील तावशी , शेवते , मेंढापूर व गोपाळपूर, मंगळवेढा तालुक्यातील देगाव, मल्लेवाडी, उत्तर सोलापूर तालुक्यातील भागाईवाडी, करमाळा तालुक्यातील सरपडोह , माळशिरस तालुक्यातील मांडवे या ठिकाणी शौचालये रंगविण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी गावातील शौचालय रंगविण्यास गती देऊन पाणी व शेतीविषयक चित्रांना प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यामध्ये सर्व शाळांनी आघाडी घेतली असून, शालेय स्वच्छता करण्यात येत आहे. शालेय स्वच्छतेबरोबरच अंगणवाडी शौचालयेदेखील रंगविण्यात येत आहेत. मोहोळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या शौचालयावर एसटी बसचे चित्र रंगविण्यात आले आहे. 

ग्रामसेवकांचा होणार गौरवस्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धेत उत्कृष्ट काम करणाºया ग्रामसेवकांचा जिल्हास्तरावर २८ जानेवारी रोजी सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली. या स्पर्धेसाठी शाळा, लोक व ग्रामपंचायती पुढे येत आहेत़ यातून स्वच्छतेबरोबरच पाण्याचे महत्त्व व प्लास्टिकचे दुष्परिणाम मांडण्यात येत आहेत. स्वच्छ व सुंदर शाळा व अंगणवाडी करणाºया कर्मचाºयांनाही विशेष सन्मानपत्र देण्यात येणार आहे. हे काम लोकसहभाग निधीतून होत असल्याबाबत भारूड यांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदgovernment schemeसरकारी योजनाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान