In the scholarship examination, the first thing in the state, | शिष्यवृत्ती परीक्षेत सांगोल्याचा सार्थक तळे राज्यात सर्वप्रथम
शिष्यवृत्ती परीक्षेत सांगोल्याचा सार्थक तळे राज्यात सर्वप्रथम

ठळक मुद्दे इयत्ता ५ वीसाठी घेण्यात येणाºया परीक्षेसाठी शहर आणि जिल्ह्यातून विविध शाळांमधील २२ हजार ९१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होतीशिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यंदा शहरी व ग्रामीण विभागातून जिल्ह्यातून १५ जण तर पूर्व माध्यमिक परीक्षेत १६ जण असे एकूण ३१ जण राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये चमकले

सोलापूर: महाराष्ट्र  राज्य पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी स्तर) शाळा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यंदा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला जिल्हा परिषदेचा सार्थक नवनाथ तळे याने ९९.३२ टक्के गुण मिळवत ग्रामीण विभागात राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. यापाठोपाठ पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्येही सांगोला तालुक्यातल्या आदित्य वसंत गोडसे याने ९१.६६ टक्के तर शहरी विभागातून माढा जिल्हा परिषद शाळेच्या तेजस कांबळे यानेही गुणवत्ता यादीत ५ वा क्रमांक मिळवून सोलापूरची मान उंचावली आहे. 

महाराष्ट्र  राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने २४ फेब्रुवारी २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता ५ वीसाठी घेण्यात येणाºया परीक्षेसाठी शहर आणि जिल्ह्यातून विविध शाळांमधील २२ हजार ९१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात प्रत्यक्ष २२ हजार ३६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातून ५ हजार ३३५ जण पात्र ठरले. १७ हजार ३० जण अपात्र ठरले तर ६४५ जण शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. पात्रतेची टक्केवारी सरासरी २३.८५ आहे. याचबरोबर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला १३ हजार ५०९ जणांनी नोंदणी केली होती. यातून प्रत्यक्ष परीक्षेला १३ हजार २४४ विद्यार्थी बसले. त्यापैकी २ हजार ८१७ विद्यार्थी पात्र ठरले. 
१० हजार ४२७ जण अपात्र ठरले आहेत. शिष्यवृत्तीसाठी ६१० पात्र ठरले आहेत. या परीक्षेसाठी जिल्ह्याचा सरासरी निकाल २१.२७ टक्के लागला आहे.

महाराष्ट्र  राज्य पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी स्तर) शाळा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यंदा शहरी व ग्रामीण विभागातून जिल्ह्यातून १५ जण तर पूर्व माध्यमिक परीक्षेत १६ जण असे एकूण ३१ जण राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये चमकले आहेत. 

गुणवत्ता यादीत शहरी भागाचा वरचष्मा
- पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतून यंदा शहरी भागातील १९ जणांनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. ग्रामीण भागातून १२ जणांचा समावेश आहे. याशिवाय सीबीएसई/ आयसीएसई विभागातून इयत्ता ५ वी, ८ वीच्या प्रत्येकी ३ अशा सहा जणांनी गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले आहे.

पूर्व माध्यमिक (शहर)
- तेजस सुरेश कांबळे (५ वा, ९३.७५ टक्के, जि. प. हायस्कूल माढा)
- निखिल अमित उपाध्ये (१४ वा, ९०.९० टक्के, एस. आर. चंडक इंग्लिश स्कूल, सोलापूर)
- अंजली अनिल दत्तू (१५ वी, ९०.२७ टक्के, इंग्लिश स्कूल, मंगळवेढा)
- हर्षद विजय इंगोले (१५ वा, ९०.२७ टक्के, सांगोला विद्यामंदिर प्रशाला, सांगोला)
- जान्हवी महिंद्र पत्की, (१७ वी, ८९.५८ टक्के, सांगोला विद्यामंदिर, सांगोला)
- अस्मिता विकास मोरे (१९ वी, ८८.८८ टक्के, इंग्लिश स्कूल मंगळवेढा)
- प्राची राजेंद्र बाबर (१९ वी, ८८.८८ टक्के, सांगोला विद्यामंदिर प्रशाला, सांगोला)
- ओजस्वी शंकर दसाडे (१९ वी, ८८.८८ टक्के, सांगोला विद्यामंदिर प्रशाला, सांगोला)
- श्रद्धा रवींद्र शिंदे (१९ वी, ८८.८८ टक्के, सुलाखे हायस्कूल, बार्शी)

असे आहेत राज्यस्तरीय गुणवत्ताधारक
- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा: सार्थक नवनाथ तळे (राज्यात पहिला, ९९.३२ टक्के, जि. प. शाळा आदलिंगे, सांगोला) 
- सिद्धेश्वर धोंडिराम भाजीभाकरे (राज्यात ५ वा, ९५.९४ टक्के, रामभाऊ जोशी हायस्कूल, करकंब)
- दिग्विजय नेताजी पाटील (राज्यात ५ वा, ९५.२७, जि. प. प्राथमिक शाळा आदलिंगे, सांगोला)
- अनिकेत लक्ष्मण खडके (राज्यात ८ वा, ९४.५९, जि. प. प्राथ. शाळा, शेटफळ, ता. मोहोळ)
- श्रेयस महावीर वाघमारे (१० वा, ९३.९१ टक्के, जि. प. प्राथमिक शाळा वांगी नं. १, ता. करमाळा)

शहरी
- महेंद्र आमरेंद्र देवधर (राज्यात ८ वा, ९५.२७ टक्के, नूतन मराठी विद्यालय, मंगळवेढा)
- सारंग बाळासाहेब धांडोरे (१५ वा, ९३.२४ टक्के, सांगोला विद्यामंदिर, सांगोला)
- सौरभ नितीन पाटील (१५ वा, ९३.२४ टक्के, यशवंत विद्यालय पंढरपूर)
- यशस्वी सतीश पवार (१५ वा, ९३.२४ टक्के, यशवंत विद्यालय, पंढरपूर)
- अमित गणपत गाढवे (१५ वा, ९३.२४ टक्के, सुलाखे हायस्कूल बार्शी)
- श्रेयस नागेश भोसले (१८ वा, ९२.५६ टक्के, सांगोला विद्यामंदिर, सांगोला)
- पीयूष प्रमोद जलगिरे (२१ वा, ९१.८९ टक्के, सांगोला विद्यामंदिर, सांगोला)
- ऋषी भारत पैलवान (२१ वा, ९१.८९ टक्के, उत्कर्ष प्राथमिक शाळा, सांगोला)
- दर्शन दत्तात्रय गायकवाड (२१ वा, ९१.८९ टक्के, के. एस. लक्ष्मीबाई प्रशाला, मंगळवेढा)
- हर्षदा सदाशिव वाघ (२१ वी, ९१.८९ टक्के, इंग्लिश स्कूल मंगळवेढा)


Web Title: In the scholarship examination, the first thing in the state,
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.