चोरांच्या धास्तीने दोन एकर ऊस पेटविला
By Admin | Updated: November 5, 2014 15:13 IST2014-11-05T15:12:04+5:302014-11-05T15:13:55+5:30
चोरीला दोन दिवस उलटले, पोलिसांत फिर्याद दिली, गावकर्यांसह पीडितांनी चोरांचा माग शोधला, पण ते सापडले नाहीत. शेवटी उसात चोर लपल्याची अफवा पसरली.

चोरांच्या धास्तीने दोन एकर ऊस पेटविला
सोलापूर : चोरीला दोन दिवस उलटले, पोलिसांत फिर्याद दिली, गावकर्यांसह पीडितांनी चोरांचा माग शोधला, पण ते सापडले नाहीत. शेवटी उसात चोर लपल्याची अफवा पसरली. सगळ्या बाजूने उसाला घेराव घालण्यात आला. पोलिसांना कळविले. दरम्यान काही ग्रामस्थांनी उसात चोर लपलेत ना, मग ऊसच पेटवू, असा निर्णय घेऊन गाळपाच्या मार्गावर असलेला दोन एकर ऊस पेटवून देण्यात आला. पाहता पाहता नगदी पीक ऊस जळून खाक झाला. हा प्रकार कंदलगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे मंगळवारी सकाळच्या सुमारास घडला. |