शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
6
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
7
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
8
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
9
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
10
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
11
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
12
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
13
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
14
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
15
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
16
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
17
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
18
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
19
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
20
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

सौरभ अनपटचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:42 IST

कुर्डूवाडी : चिंचोली (ता. माढा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या सौरभ बाळासाहेब अनपट या विद्यार्थ्यांने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात ...

कुर्डूवाडी : चिंचोली (ता. माढा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या सौरभ बाळासाहेब अनपट या विद्यार्थ्यांने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दहावा क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल त्याचे मुख्याध्यापक गोसावी, वर्गशिक्षक सुहास चवरे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष बाळासाहेब अनपट यांनी कौतुक केले आहे.फोटो : ०२ सौरभ अनपट

--

मका आधारभूत खरेदी केंद्राला सुरुवात

कुर्डूवाडी : जिल्हा मार्केटिंग व कुर्डूवाडी सबएजंट कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्तरीत्या सुरु केलेल्या आधारभूत मका किंमत खरेदी केंद्राचे उद्‌घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील- जामगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी बाजार समितीचे संचालक सुरेश बागल, संदीप भोसले, थोरात, माढेश्वरी बँकेचे संचालक गणेश काशीद, बाजार समितीचे प्रभारी सचिव अजिनाथ बोंगाळे उपस्थित होते.

फोटो : ०२ कुर्डूवाडी मका

मका आधारभूत खरेदी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी सुहास पाटील-जामगावकर, सुरेश बागल

---बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य

कुर्डूवाडी : प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने माढा तालुक्यात उंदरगाव येथे बांधकाम नोंदणी अभियान अंतर्गत नोंदणीकृत कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच देण्यात आले. यावेळी प्रहारचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके उपस्थित होते.

फोटो : ०२ प्रहार

---

कुर्डूवाडीत एड्स जनजागृती

कुर्डूवाडी : येथील ग्रामीण रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संतोष अडगळे यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी सुनंदा गायकवाड, आरोग्यसेविका, नागरिक उपस्थित होते. यावेळी एड्सबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

फोटो : ०२ एड्स

----

लोकमंगल महाविद्यालयात संविधान दिन साजरा

उत्तर सोलापूर: वडाळा येथील लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राष्ट्रीय संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माण तालुक्यातील एस.डी. विद्यालयाचे प्रा. लक्ष्मण मोहिते होते. ‘भारतीय संविधान समज-गैरसमज’ या विषयाच्या माध्यमातून प्रा. मोहिते यांनी भारतीय संविधानातील निर्मितीपासून ते मूलभूत हक्क कार्य, घटनाकारांच्या कल्याणकारी धोरणांचा उल्लेख केला. प्राचार्य डाॅ. सचिन फुगे, रा.से. यो.चे कार्यक्रम अधिकारी डॉ. गणेश पवार, प्राचार्य .डॉ. सचिन, स्वयंसेविका प्राची गोवर्धन, सागर गाडे, अनिकेत काकडे उपस्थित होते.

----