शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

सोलापुरातील संभाजी तलावाला जलपर्णीचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 4:01 PM

सोलापूर महापालिकेचे दुर्लक्ष; राणी लक्ष्मीबाई उद्यानाची दुरवस्था,  सुशोभीकरणाची निविदा प्रक्रिया अडकली कागदात

ठळक मुद्देधर्मवीर संभाजी तलावाला जलपर्णीचा वेढा पडला असून, महापालिकेचे याकडे कमालीचे दुर्लक्षतलावाच्या सुशोभीकरणाची निविदा प्रक्रिया अद्याप कागदी घोड्यांमध्ये अडकून पडलीसंभाजी तलाव हे शहरातील एक उत्तम पर्यटनस्थळ आणि पशुपक्ष्यांचा अधिवास असलेले ठिकाण

सोलापूर : धर्मवीर संभाजी तलावाला जलपर्णीचा वेढा पडला असून, महापालिकेचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. तलावाच्या सुशोभीकरणाची निविदा प्रक्रिया अद्याप कागदी घोड्यांमध्ये अडकून पडली आहे. राणी लक्ष्मीबाई उद्यानाची दुरवस्था झाली आहे. संभाजी तलाव हे शहरातील एक उत्तम पर्यटनस्थळ आणि पशुपक्ष्यांचा अधिवास असलेले ठिकाण आहे.  ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी रविवारी तलाव परिसराची पाहणी केली. राणी लक्ष्मीबाई उद्यानाच्या बाजूने असलेल्या तलावाच्या कठड्यांची दुरवस्था झाली आहे.

उद्यानात गवत वाढले असून तलावाच्या काठावरील फूटपाथही खराब झाला आहे.  कठडे फुटलेले असून आजूबाजूला कचरा पडलेला होता. विसर्जन हौदांची कचरा कुंडी झाल्याचे पाहायला मिळाले. शहरातील काही नागरिक या हौदात कचरा टाकत असल्याचे पाहायला मिळाले. तलावात जलपर्णीचा वेढा पडला असून पाण्यावर गवताचा गालीचा तयार झाल्याची स्थिती आहे. या जलपर्णीमुळे एरव्ही मुक्त विहार करणारे बगळे गायब होते. स्मृती वनाच्या बाजूला गवत आणि कचरा वाढला आहे.

केंद्रीय सरोवर संवर्धन योजनेतून संभाजी तलावाच्या सुशोभीकरणाची कामे मंजूर करण्यात आली आहेत. यासाठी महापालिकेने दोनवेळा निविदा काढल्या. कंत्राटदार न मिळाल्याने निविदांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. तलावाचे सुशोभीकरण होणार असल्याने नगर अभियंता कार्यालय आणि उद्यान विभागाने तलाव परिसराचे दुर्लक्ष केले आहे. दोन महिन्यांपूर्वी शहरातील काही तरुणांनी जलपर्णी काढली होती, परंतु महापालिकेला जलपर्णी काढण्यास वेळच मिळाला नाही. उद्यान विभागाकडे कर्मचाºयांची कमतरता असल्याने त्यांनीही तलाव आणि राणी लक्ष्मीबाई उद्यानाकडे दुर्लक्ष केले आहे. 

सामाजिक संघटनांनी बोलावली बैठक - संभाजी तलावाला अच्छे दिन यावेत यासाठी शहरातील सामाजिक संघटना एकत्र येत आहेत.  संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शाम कदम आणि होटगी रोड सोशल फाउंडेशनचे शाम पाटील यांच्या पुढाकाराने मंगळवारी सायंकाळी राणी लक्ष्मीबाई उद्यानात शहरातील सामाजिक संघटना, पर्यावरण प्रेमींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

मनपा प्रशासन कार्यरत आहे का? - संभाजी तलावाची अवस्था पाहता महापालिकेचे प्रशासन कार्यरत आहे का? असा प्रश्न पडतो. वन्यजीवांची काळजी म्हणून या तलावातील जलपर्णी हटविण्याचे काम सुरू करायला हवे. गेल्या एक वर्षापासून केंद्र शासनाच्या योजनेतून काम होणार असल्याचे सांगितले जात आहे. हे काम होईल तेव्हा होईल. सध्या जलपर्णी हटवा, असे नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलचे सदस्य पप्पू जमादार म्हणाले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका