शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

सोलापूर जिल्हा परिषदेवर संजय शिंदे यांची पकड घट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 5:44 PM

विश्लेषण - अर्थसंकल्पीय सभेत दिसले राजकीय रंग, वर्षानंतरही मोहिते-पाटील एकाकी !

ठळक मुद्देमागील पंचवार्षिकमध्ये सुरेश हसापुरे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचा ताबाजिल्हा परिषदेच्या कारभाराचा गाडा संजय शिंदे यांनी पूर्णपणे ताब्यात घेतला

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या राजकारणावर, प्रशासनावरही संजय शिंदे यांची पकड घट्ट झाल्याचे आणि एक वर्षानंतरही मोहिते-पाटील गट एकटा पडल्याचे मंगळवारी झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत दिसून आले.

जिल्हा परिषदेची मंगळवारी झालेली अर्थसंकल्पीय सभा नावीन्यपूर्ण योजनांबरोबरच राजकीय कारणांनी चर्चेत राहिली. जिल्हा परिषदेच्या सेस फंडाचे प्रत्येक तालुक्यातील समान वाटप व्हायला हवे, अशी मागणी मोहिते-पाटील गट करीत आहे. उमेश पाटील यांनी तर या प्रश्नावरून संजय शिंदे यांची कोंडी करू, असा इशारा दिला होता. काल सभेत मोहिते-पाटील गटाचे सदस्य त्रिभुवन धार्इंजे यांनी सेस फंडाच्या असमान वाटपाचा मुद्दा उपस्थित केला.

 यासाठी त्यांनी व्यवस्थित आकडेवारीही सादर केली. हा विषय उपस्थित होणार असल्याची जाणीव शिंदे यांना होती. त्यामुळे तेही मागील काही वर्षातील सेस फंडाच्या तालुकानिहाय वाटपाची आकडेवारी घेऊन बसले होते. धार्इंजे यांना प्रत्युत्तर देताना शिंदे यांनी प्रत्येक तालुक्याला अनुशेष लावेन, असे सांगतानाच राजकारण केले तर याद राखा, असा इशाराही दिला.

धार्इंजे एकटे पडले. त्यांना बळीराम साठे यांनी सावरून घेण्याचा प्रयत्न केला. मोहिते-पाटलांचे स्नेही वसंतराव देशमुख यांनी शिंदे यांना सबुरीचा सल्ला दिला. या विषयावर सभागृहाचे मत जाणून ज्यांना अडचण आहे त्यांनी हात वर करा, असे शिंदे यांनी सांगितल्यानंतर एकानेही हात वर केले नाहीत. यावरून एक वर्षानंतर आपल्याला सभागृहाचा भरभक्कम पाठिंबा असल्याचे संजय शिंदे यांनी दाखवून दिले. जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मेळ नाही. परंतु, मोहिते-पाटील गटाला वगळून ऐनवेळी सर्व जण एकत्र येतील, अशी स्थिती कायम असल्याचे संकेत झेडपीच्या सर्वसाधारण सभेने दिले आहेत. 

मामा ठरवतील तीच रणनीती ! - जिल्हा परिषदेच्या कारभाराचा गाडा संजय शिंदे यांनी पूर्णपणे ताब्यात घेतला आहे. कोणाला किती निधी द्यायचा इथपासून सर्वसाधारण सभेची रणनीती काय असेल हे तेच ठरवित आहेत. राष्ट्रवादीकडे आणि विशेषत: मोहिते-पाटील गटाकडे पाहायचे झाले तर राजकीय परिस्थितीचा अंदाज असल्याने विरोधी पक्षनेते बळीराम साठे नेमक्या मुद्यांवरच बोलणे पसंत करीत आहेत.  त्रिभुवन धार्इंजे, शीतलदेवी मोहिते-पाटील, स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांची ही पहिलीच टर्म असल्याने ते जमेल त्या पद्धतीने किल्ला लढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

पाटलांना दमवले, इतरांचे काय...- मागील पंचवार्षिकमध्ये सुरेश हसापुरे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचा ताबा घेतला होता. यावेळी उमेश पाटील वेगळ्या प्रकारे तसा प्रयत्न करीत आहेत. परंतु, काल झालेल्या सभेत संजय शिंदे यांनी उमेश पाटील यांना अक्षरश: दमविले. समाजकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे यांच्या संदर्भातील विषय असो वा विषय शिक्षकांच्या पदावनतीचा मुद्दा असो यातील एकही विषय तडीस जाऊ दिला नाही. पक्षनेते आनंद तानवडे यांनीही आता बोलण्याची चौकट आखून घेतली आहे. इतर बोलके सदस्यही आता परिस्थिती ओळखून गप्प राहणे पसंत करीत आहेत.  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद