Sanitation campaign at Solapur cemetery; Campaign of Municipal Health Department | सोलापुरातील स्मशानभूमीत स्वच्छता अभियान; महापालिका आरोग्य विभागाची मोहिम

सोलापुरातील स्मशानभूमीत स्वच्छता अभियान; महापालिका आरोग्य विभागाची मोहिम

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील विविध ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीचा परिसर स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे.

मागील काही दिवसापासून महापालिका प्रशासन करोना सारख्या महामारीशी दोन हात करून सर्वसामान्यांचे जीव वाचवण्यासाठीचे प्रयत्न करत आहे, अशा परिस्थितीत आपल्या आरोग्याची कोणतीही तमा न बाळगता पालिकेच्या आरोग्य विभागाने पालिका उपायुक्त धनराज पांडे यांच्या संकल्पनेतून शहरातील विविध ठिकाणी असलेल्या स्मशानभूमी स्वच्छता अभियानाची सुरुवात केली आहे.

आज रविवारी रुपाभवानी येथील हिंदू स्मशानभूमीत आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी रुपाभवानी स्मशानभूमीत असावेत पडलेल्या वस्तू कचरा, मातीचे ढिगारे आधी उचलून संपूर्ण परिसर स्वच्छ करून घेण्यात आला. शहरातील विविध स्मशानभूमीमध्ये स्वच्छता अभियान राबवून स्मशानभूमी स्वच्छ व सुंदर करण्याचा संकल्प आम्ही केला आहे यापुढील काळात देखील हे अभियान असेच सुरू राहील. स्मशानभूमीच्या रिकामी जागे वनराई उभा येणार आहे, तेव्हा सर्वसामान्य नागरिकांनी देखील पालिकेच्या स्वच्छ स्मशानभूमी अभियानास नक्कीच सहकार्य करतील असा विश्वास पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी व्यक्त केले.

Web Title: Sanitation campaign at Solapur cemetery; Campaign of Municipal Health Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.