कचरा वेचणाऱ्या महिलांना मान, सोलापुरात संभाजी ब्रिगेडने केला सन्मान
By Appasaheb.patil | Published: March 8, 2023 03:04 PM2023-03-08T15:04:37+5:302023-03-08T15:05:34+5:30
जागतिक महिला दिन म्हणून हा दिवस जगभर उत्साहात साजरा करण्यात येतो.
आप्पासाहेब पाटील
सोलापूर - जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला संभाजी ब्रिगेड च्या वतीने समाजातील वंचित घटक असलेल्या कचरा वेचणाऱ्या महिलांचा मानाचा फेटा, साडी चोळी, गुलाब पुष्प व मिठाई देऊन महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला.
जागतिक महिला दिन म्हणून हा दिवस जगभर उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिवशी कर्तबगार महिलांचा सन्मान सगळीकडे होत असतो पण सकाळपासून वेगवेगळे ठिकाणी पडलेला कचरा प्लास्टिक लोखंड गोळा करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवून संसाराचा गाडा ओढणाऱ्या व आपल्या मुलांना शिक्षण देणाऱ्या समाजापासून उपेक्षित असलेल्या या कचरा वेचणाऱ्या महिलांचा सन्मान संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, उपशहर प्रमुख सिताराम बाबर, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, राजेंद्र माने, कृष्णा झिपरे, प्रशांत एक्कड, शिवशरण बोरोटे, सलीम रंगरेज, दत्ता जाधव, संतोष भोसले, चेतन कदम, कृष्णा चाबुकस्वार, नवनाथ देडे, सागर सलगर, विशाल भोसले, अमोल भोसले इत्यादी उपस्थित होते.