साम, दाम, दंड, भेद.. जे लागेल ते पुरविले जाईल; पालकमंत्री जयकुमार गोरेंचं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 16:52 IST2025-11-24T16:50:37+5:302025-11-24T16:52:42+5:30
नगराध्यक्षपदासाठी विलासराव घुमरे यांच्या पत्नी जयश्री घुमरे इच्छुक होत्या. दरम्यान, भाजपने त्यांना तिकीट नाकारल्याने घुमरे व समर्थक नाराज झाले होते.

साम, दाम, दंड, भेद.. जे लागेल ते पुरविले जाईल; पालकमंत्री जयकुमार गोरेंचं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर विधान
करमाळा : सर्वांनी एकदिलाने काम करून नगर परिषदेवर भाजपची सत्ता आणावी यासाठी व साम, दाम, दंड, भेद यापैकी जे लागेल ते पुरविले जाईल, असे विधान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
करमाळा येथे भाजप पदाधिकाऱ्यांसह उमेदवारांच्या बैठकीत ते बोलताना म्हणाले, भाजपने स्वबळावर निवडणुकीचा नारा दिला आहे. करमाळा नगरपरिषदेवर भाजपचा नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी मी रश्मी बागल व विलासराव घुमरे यांच्यावर जबाबदारी सोपवत आहे.
भाजपच्या महिला आघाडीच्या प्रांतिक उपाध्यक्ष रश्मी बागल यांच्या निवासस्थानी पालकमंत्री गोरे यांनी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व उमेदवारांची बैठक घेतली.
घुमरे यांची नाराजी दूर...
नगराध्यक्षपदासाठी विलासराव घुमरे यांच्या पत्नी जयश्री घुमरे इच्छुक होत्या. दरम्यान, भाजपने त्यांना तिकीट नाकारल्याने घुमरे व समर्थक नाराज झाले होते. पालकमंत्र्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची व समर्थक कार्यकर्त्यांची नाराजी दूर केली.
दहशतमुक्त अकलूज भाजपचा संकल्प : गोरे
सत्तेचे केंद्र असलेल्या अकलूजचा विकास झाला असेल वाटले होते. पण येथील नागरिकांच्या मूलभूत समस्या सुटल्या नाहीत. अकलूजच्या विकासाऐवजी दुर्दशाच झाली आहे. आपण येथे कुणाची जिवण्यासाठी नाही, तर पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी आलो आहे. सर्वसामान्यांना कसलीही संधी मिळत नसल्याने भाजपने दहशतमुक्त अकलूज करण्याचा संकल्प केला असल्याची भूमिका पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केली.