कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरण; सदाभाऊ खोत यांनीही ईडीसमोर जायला हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 15:13 IST2020-01-24T15:12:51+5:302020-01-24T15:13:57+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचे वक्तत्व; शेतकºयांसाठी कोणालाही अंगावर घेण्याची तयारी

कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरण; सदाभाऊ खोत यांनीही ईडीसमोर जायला हवे
सोलापूर : महाराष्ट्रातील कडकनाथ कोंबडी पालन घोटाळा आता कर्नाटक, छत्तीसगढ या राज्यांमध्ये पसरलेला असून, त्यामध्ये एकाने आत्महत्या केली आहे. ज्याप्रमाणे शरद पवार यांनी ईडीसमोर जाऊन आपले म्हणणे मांडले, त्याचप्रमाणे सदाभाऊ खोत देखील ईडी सामोरे जायला हवे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
सोलापूर येथील कार्यक्रमासाठी जात असताना शुक्रवारी सकाळी कर्जमाफी संपूर्ण सातबारा कोरा व्हावा यासाठी विठ्ठलाकडे साकडे घातले़ नामदेव पायरी येथे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सात बारा कोरा व्हावा यासाठी कुणालाही अंगावर घेण्याची तयारी असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. शिखर बँकेतील गैरप्रकार प्रकरणांची चौकशी व्हायला हवी, भाजपाने यासाठी जोर लावावा असेही राजू शेट्टी म्हणाले.