बोरामणी हद्दीत दरोडा; चोरट्यांच्या मारहाणीत वृध्दाचा मृत्यू, महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 10:58 IST2022-03-09T10:58:07+5:302022-03-09T10:58:12+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Robbery at Boramani border; An old man was killed and a woman was injured in a robbery | बोरामणी हद्दीत दरोडा; चोरट्यांच्या मारहाणीत वृध्दाचा मृत्यू, महिला जखमी

बोरामणी हद्दीत दरोडा; चोरट्यांच्या मारहाणीत वृध्दाचा मृत्यू, महिला जखमी

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास दरोडा पडला. या दरोड्यात एका वृध्द व्यक्तीचा मृत्यू झाला असून अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

सोलापूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर सोलापूर-हैद्राबाद महामार्गावर बोरामणी गाव आहे. या गावापासून दर्गनहळ्ळी रोडवर वस्ती आहे. या वस्तीवर पहाटेच्या सुमारास चोरट्यांनीचोरीचा प्रयत्न केला. या चोरीच्या वेळी चोरी विरोध करताना वृध्दाला चोरट्यांनी मारहाण केली. या मारहाणीत त्या वृध्दाचा मृत्यू झाला अन्य एक महिला जखमी आहे. त्या महिलेवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने बोरामणी परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

Web Title: Robbery at Boramani border; An old man was killed and a woman was injured in a robbery