शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

संचालकांसह अधिकाऱ्यांवर ठपका

By admin | Updated: July 3, 2014 01:16 IST

छावणीमधील गैरव्यवहार; ‘दामाजी’च्या संचालकांकडून २ टक्के व्याजदराने पैसे वसुलीचे आदेश

मंगळवेढा : मंगळवेढ्याच्या संत दामाजी साखर कारखान्यामार्फत चालविलेल्या चारा छावणीमधील आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीचा अहवाल उपजिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त व साखर आयुक्तांकडे सादर केला. यातील गैरव्यवहाराची रक्कम दरमहा दोन टक्के व्याजदराने कारखान्याकडून वसूल करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.याबरोबरच तत्कालीन प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकुनांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, संचालकांना दोषी धरण्यात आले आहे.शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर हेंबाडे यांनी दामाजी कारखान्यावरील चारा छावणीमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याबाबत ३१ मे २०१३ व १९ जून २०१३ रोजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून विभागीय आयुक्तांनी जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश चव्हाण यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. यामध्ये तक्रारदार सिद्धेश्वर हेंबाडे यांचे म्हणणे व कागदोपत्री पुराव्यांबरोबरच ११ मुद्द्यातील १० मुद्द्यांमध्ये सत्य असल्याचे आढळून आले. रमेश तांबे या १६ वर्षांपूर्वी मयत झालेल्या माणसाच्या नावे बोगस व्हाऊचर तयार करून खर्ची टाकलेल्या रकमेची दरमहा २ टक्के व्याजदराने वसुली करण्याचे मंगळवेढा प्रांताधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. याबरोबरच बोगस व्हाऊचरच्या ३ लाख २७ हजारांच्या रकमेचीही वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. कडबा कटर व जनरेटर मोहन दगडू सुरवसे यांना दिला नसतानाही त्यांच्या नावे २१ मे २०१३ रोजी १ लाख ५० हजार अदा करून उचलल्याचे सिद्ध झाले असून, त्यांच्याही वसुलीचे आदेश दिले आहेत. चारा वाटपातील तफावत व अनियमितत ेबाबत प्रादेशिक उपसंचालक साठे यांच्या अहवालात कारखान्याने चारा पुरविण्यासाठी ६४ हजार ७९६ मेट्रिक टन चारा खरेदी केला असून, शासनाच्या मागणीनुसार ६१ हजार ७७१ टन चारा पुरवठा केला असून, तेवढेच बिल मिळाले आहे. ३ हजार २५ मे. टन चारा जास्तीचा कारखान्याचे संचालक मंडळ ३१ आॅगस्ट २0१३ रोजी ठरावात चारा वाटपात आलेल्या त्रुटीची चौकशी करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्याचे ठरले असून, त्याची प्रत सादर केली आहे. या ठरावावर सह्या करणारे संचालक या घोटाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. शेण विक्रीतून १४ लाख ८० हजारांपेक्षा जास्त रक्कम मिळणे आवश्यक असताना कारखान्याने केवळ १ लाख १७ हजार रुपये वसूल केल्याच्या तक्रारीवर प्रादेशिक संचालक साठे यांच्या अहवालात ती १४ लाख ८० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम शेण विक्रीतून मिळणे आवश्यक असे कळविले असल्याने १३ लाख ६३ हजार कार्यकारी संचालक व संचालक मंडळाकडून वसूल करावे, असा अहवाल साखर आयुक्तांना सादर केला आहे. ----------------------------या अधिकाऱ्यावर ठपकातत्कालीन प्रांताधिकारी बाबासाहेब बेलदार, तहसीलदार गोविंद सांगडे, नायब तहसीलदार व्ही. टी. जमादार, अव्वल कारकून एस. टी. कोळेकर यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ------------------खुलासा मागविला नाहीकारखान्याने तहसील कार्यालयाकडे सादर केलेल्या रेकॉर्डमध्ये आढळून आलेल्या त्रुटीमध्ये कारखान्याला नोटीस काढून खुलासाही महसूल अधिकाऱ्यांनी मागविला नाही. यामुळे आता संचालकांसह अधिकाऱ्यांवर याचा ठपका पडला आहे.