शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

रणजितसिंह मोहिते - पाटील यांची मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची चर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 5:59 PM

रणजितदादा मुख्यमंत्र्यांची भेटीला; १४ जुलै रोजी होणार राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार

ठळक मुद्देभाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह सहा जणांचा शपथविधी होणार असल्याची चर्चाही आहेया मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे सहा आणि शिवसेनेचा एक मंत्री शपथ घेणार भाजप नेते आशिष शेलार यांनाही विस्तारात स्थान मिळणार असल्याचं म्हटलं जातं.

सोलापूर : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार १४ जूनला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विरोधी पक्षातील राधाकृष्ण विखे पाटील, अब्दुल सत्तार, रणजितसिंह मोहिते - पाटील आणि कालिदास कोळंबकर हे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते. त्यामुळे रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा मंत्रीमंडळातील प्रवेश नक्की मानला जात आहे.

रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत लोकसभा निवडणूकीपुर्वी भाजप पक्षात प्रवेश केला होता़ त्यानंतर लोकसभा निवडणुकीवेळी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर याच्या प्रचारार्र्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा अकलूज शहरात पार पडली़ या सभेला विराट जनसमुदाय गोळा करून मोहिते-पाटील परिवाराने मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. त्यानंतर लोकसभा प्रचारात अकलूजमधून १ लाख मताचा लीड रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना मिळवून देऊ असेही मोहिते-पाटील परिवाराने सांगितले होते त्यानुसार एक लाखांच्या वर लीड मोहिते-पाटील यांनी दिला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास संपादन करण्यातही मोहिते-पाटील परिवाराने कुठेही कसर ठेवली नाही. या एकूणच कामगिरीवरून रणजितसिंह मोहिते-पाटीलांची मंत्रीमंडळातील वर्णी १०० टक्के खरी मानली जात आहे.

भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह सहा जणांचा शपथविधी होणार असल्याची चर्चाही आहे तर शिवसेनेची एकाच वाढीव मंत्रिपदावर बोळवण होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे सहा आणि शिवसेनेचा एक मंत्री शपथ घेणार आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनाही विस्तारात स्थान मिळणार असल्याचं म्हटलं जातं.

विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती भाजप मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. सर्वांना लवकरच खुशखबर मिळेल. शिवसेना आणि इतर मित्रपक्षांना त्यांच्या अपेक्षेनुसार मंत्रिपदं मिळतील, असं मुनगंटीवार म्हणाले.

टॅग्स :SolapurसोलापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलBJPभाजपाCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार