शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

Ramdas Athavale: 'संजय राऊतांनी मुलीच्या लग्नात पाहिजे तेवढा खर्च करावा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 14:57 IST

सोलापूर/पंढरपूर - शिवसेना नेते संजय राऊत आज पत्रकार परिषद घेणार असून त्यांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. गेल्या ...

सोलापूर/पंढरपूर - शिवसेना नेते संजय राऊत आज पत्रकार परिषद घेणार असून त्यांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेत सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात झालेल्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावरुन, केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, भाजपला याबाबत काहीच आक्षेप नसल्याचं आठवलेंनी म्हटलं. 

खाजगी कार्यक्रमानिमित्त केंद्रीय मंत्री रामदास आठवले सोमवारी पंढरपूर येथे आले होते. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रिपाइंचे राजाभाऊ सरवदे, सुनील सर्वगोड, जितेंद्र बनसोडे, संतोष पवार, ॲड. कीर्तिपाल सर्वगोड, सचिन भोसले आदी उपस्थित होते. आठवले पुढे म्हणाले, पाच राज्यांत निवडणुका होत आहेत. त्या ठिकाणी भाजप व एनडीएची सत्ता येणार आहे. राज्य सरकार योग्य काम करीत नाही. देशातील इतर राज्यांतील रस्त्यांच्या तुलनेने आपल्या राज्यातील रस्ते खूप खराब आहेत. रस्त्यांवर खूप खड्डे आहेत. याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. राज्य सरकार दलित समाजावर अन्याय करीत आहे. अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाला निधी दिला नाही. अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आ. रमेश कदम यांना शिक्षा झाली आहे, परंतु त्यांची शिक्षा दलित समाजातील तरुणांना देऊ नये. राज्य सरकारने या महामंडळासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. रिपाइं सतत मुस्लीम समाजाच्या बाजूनेच असते. परंतु हिजाबवरून शाळेसारख्या पवित्र ठिकाणी धर्म आणू नये, असे खा. आठवले यांनी सांगितले.

राऊतांनी मुलीच्या लग्नात पाहिजे तेवढा खर्च करावा

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या विवाहसोहळा एका  पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा झाला. या सोहळ्यातील कार्यक्रमांचे लाखो रुपयांचे बिल कोणी भरले, असा प्रश्नही किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात आठवलेंनी मत व्यक्त केले आहे. शिवसेनेचे खा. संजय राऊत सतत मोदींवर टीका करीत असतात. त्यांच्या या कृतीचा फटका शिवसेनेलाच बसेल. राऊत यांनी त्यांच्या मुलीचे लग्न जसे करायचे तसे करावे. लग्नात पाहिजे तेवढा खर्च करावा, याबाबत भाजपचा काही आक्षेप नसल्याचे खा. आठवले म्हणाले.

ब्लॅक पँथर चळवळ पुन्हा जिवंत करण्यासाठी प्रयत्न सुरू

पँथरला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. संघर्ष करणारी संघटना रिपाइंबरोबर असावी, असा कार्यकर्त्यांचा विचार आहे. यामुळे ब्लॅक पँथर चळवळ पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली असल्याचे आठवले यांनी सांगितले.

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना