दिव्यांगांसाठी रेल्वे लवकरच पोर्टेबल अ‍ॅल्युमिनियम रॅम्पची सुविधा देणार !

By appasaheb.patil | Published: November 12, 2019 10:47 AM2019-11-12T10:47:04+5:302019-11-12T10:55:16+5:30

मध्य रेल्वे : सोलापूर स्थानकावर १४ व्हीलचेअरसह १, २, ३ प्लॅटफॉर्मवर लिफ्ट कार्यान्वित

Railway will soon provide portable aluminum ramp for the disabled! | दिव्यांगांसाठी रेल्वे लवकरच पोर्टेबल अ‍ॅल्युमिनियम रॅम्पची सुविधा देणार !

दिव्यांगांसाठी रेल्वे लवकरच पोर्टेबल अ‍ॅल्युमिनियम रॅम्पची सुविधा देणार !

Next
ठळक मुद्देसोलापूर विभागातील सर्वच स्थानकावर दिव्यांगासाठीच्या सर्व सेवासुविधा पुरविण्यात आलेल्या आहेतयेत्या दोन ते तीन महिन्यांत प्लॅटफॉर्म क्रमांक ४ व ५ वरही दिव्यांगांसाठी लिफ्ट बसविण्यात येणारमध्य रेल्वे स्थानकावर दिव्यांग प्रवाशांसाठी सुविधा देण्यात तत्पर

सोलापूर : वृद्ध व अपंग प्रवाशांना रेल्वे गाड्यांच्या कोचमध्ये सहज जाता यावे, यासाठी मध्य रेल्वेच्यासोलापूर स्थानकावर लवकरच पोर्टेबल अ‍ॅल्युमिनियम रॅम्पची व्यवस्था करण्यात येणार आहे़ याशिवाय येत्या दोन ते तीन महिन्यांत प्लॅटफॉर्म क्रमांक ४ व ५ वरही दिव्यांगांसाठी लिफ्ट बसविण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

दरम्यान, वृद्ध, अपंग व आजारी प्रवाशांना अनेकदा गाडीत चढता येत नाही. त्यांना अक्षरश: उचलून न्यावे लागते. व्हीलचेअरने ते कोचपर्यंत येऊ शकतात, मात्र व्हीलचेअर कोचमध्ये नेण्याची सोय आतापर्यंत नाही. नागपूर विभागाच्या सहकार्याने व सोलापूर मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पोर्टेबल अ‍ॅल्युमिनियम रॅम्पची सुविधा सोलापूर विभागातील सर्वच स्थानकावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही हिरडे यांनी दिली.
मध्य रेल्वे स्थानकावर दिव्यांग प्रवाशांसाठी सुविधा देण्यात तत्पर आहे.

सोलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ व ३ वर लिफ्ट बसविण्यात आले असून आगामी काही महिन्यात प्लॅटफॉर्म क्रमांक ४ व ५ वरही लिफ्टची सुविधा करण्यात येणार आहे़ याशिवाय प्लॅटफॉर्म क्र. १ आणि २ व ३ वर एस्केलेटरची व्यवस्था आहे. कोणत्याही दिव्यांग प्रवाशाला स्थानकात प्रवेश करतेवेळी अडचण येऊ नये यासाठी स्थानकासमोरील इमारतीजवळ दोन्ही बाजूस रॅम्प उभा करण्यात आला आहे़ दिव्यांग प्रवाशांसाठी स्थानकावर १४ व्हीलचेअर मोफत वापरण्यासाठी आहेत़ दिव्यांगांसाठी शौचालय आणि पिण्याच्या पाण्याचे नळ, वाहन ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था, व्हीलचेअरला प्रत्येक प्लॅटफॉर्मवर येण्या-जाण्याकरिता पाथवेची व्यवस्था करण्यात आली आहे.

चौकशी कक्षातील सुविधांचे काय ?
- रेल्वेस्थानकात कर्णबधिर, मुके (बोलता न येणारे दिव्यांग) यासाठी आवश्यक त्या सूचना अथवा हस्तभाषा अवगत येणारे दुभाषी अथवा चौकशी कक्षात सुविधा उपलब्ध करणे बंधनकारक आहे. मात्र, अशा सुविधा सोलापूर विभागातील कोणत्याच रेल्वे स्थानकावर नसल्याने अशा दिव्यांगांची गैरसोय होत आहे़ याही सुविधांकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यावे,अशी मागणी अपंग संघटनेने केली आहे़

सोलापूर विभागातील सर्वच स्थानकावर दिव्यांगासाठीच्या सर्व सेवासुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत़ लवकरच नागपूर विभागाच्या इतवारी स्थानकावर करण्यात आलेल्या पोर्टेबल अ‍ॅल्युमिनियम रॅम्पसारखी सुविधा सोलापूर विभागातील प्रत्येक स्थानकावर करण्याचा आमचा मानस आहे़ त्यादृष्टीने योग्य ती पाऊले उचलणार आहोत़ शिवाय प्लॅटफॉर्म क्रमांक ४ व ५ वर लवकरच दिव्यांगासाठी लिफ्टची उभारणी करणार आहोत़
- प्रदीप हिरडे,
वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, मध्य रेल्वे, सोलापूर विभाग़

Web Title: Railway will soon provide portable aluminum ramp for the disabled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.