दोन तांड्यांवर छापा, लाखोंची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:23 IST2021-05-09T04:23:26+5:302021-05-09T04:23:26+5:30

या वेळी पोलिसांनी राजू शेवू चव्हाण, सुरेश धनू राठोड, पांडू रामू चव्हाण, संतोष नारायण चव्हाण, शंकर रेवू चव्हाण या ...

Raids on two tanks, seizure of lakhs of liquor | दोन तांड्यांवर छापा, लाखोंची दारू जप्त

दोन तांड्यांवर छापा, लाखोंची दारू जप्त

या वेळी पोलिसांनी राजू शेवू चव्हाण, सुरेश धनू राठोड, पांडू रामू चव्हाण, संतोष नारायण चव्हाण, शंकर रेवू चव्हाण या हातभट्टीधारकांकडून दारू व त्याचे साहित्य असे एकूण ५० हजार ९०० रुपये किमतीची अवैध दारू व साहित्य जप्त केले. याबाबत पोलीस नाईक अजयसिंह शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

तसेच भोसगे लमाण तांडा येथे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ६७ हजार ५०० रुपये किमतीचे अवैध दारू निर्मिती साहित्य, मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई ६ मे रोजी केली आहे. याबाबत दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबतची फिर्याद पोलीस नाईक श्रीकांत श्यामराव जवळगे यांनी दिली आहे. आरोपी रमेश शिवाजी राठोडकडून १२ हजार ५०० रुपयांची ४०० लीटर, गोपू गणपती चव्हाण याच्याकडून ६ हजार २५० रुपये किमतीची २०५ लीटर, शिवाजी गणपती चव्हाणकडून सहा हजारांची २०० लीटर, शंकर केसूर राठोडकडून १० लीटर ५०० रुपये किमतीची, शिवाजी राठोड याच्याकडून ४०० लीटर १२ हजार रुपयांची, रवी शंकर चव्हाण याच्याकडून ४०० लीटर १२ हजारांची, लक्ष्मण चंदू चव्हाण याच्याकडून ४०० लीटर १२ हजारांची अशी तब्बल ६७ हजार ५०० रुपयांची अवैध दारू व निर्मिती साहित्य जप्त करण्यात पोलिसांना यश आले. एकाच दिवशी दोन तांड्यांवर पोलिसांनी छापे टाकून ही कारवाई केली आहे.

-----

Web Title: Raids on two tanks, seizure of lakhs of liquor