राहुल गांधी यांची सोलापुरात सभा, जागेची पाहणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 02:24 PM2019-02-05T14:24:17+5:302019-02-05T14:26:02+5:30

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वरचष्म्याला शह देण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांची जाहीर सभा पार्क ...

Rahul Gandhi's meeting in Solapur, continuation of the survey of the land | राहुल गांधी यांची सोलापुरात सभा, जागेची पाहणी सुरू

राहुल गांधी यांची सोलापुरात सभा, जागेची पाहणी सुरू

Next
ठळक मुद्दे१३ फेब्रुवारी रोजी मुंबई व भिवंडी दौºयातून सोलापूरच्या सभेला किती वेळ मिळू शकतो याची चाचपणीशहर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी मात्र सभेच्या तयारीला लागले आहेत आता कार्यकर्त्यांकडून सभेसाठी इंदिरा गांधी पार्क स्टेडियमच पर्याय होऊ शकतो असा आग्रह धरला

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वरचष्म्याला शह देण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांची जाहीर सभा पार्क स्टेडियमवरच घ्यावी असा आग्रह काँग्रेस कार्यकर्त्यांमधून सुरू झाला आहे. त्यामुळे हा पाचवा पर्याय निश्चित केला जाण्याची शक्यता सूत्राने व्यक्त केली. 

प्रदेश काँग्रेस कमिटीकडून सोमवारी राहुल गांधी यांच्या दौºयाबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे दौरा निश्चित करण्यासाठी आज दिल्लीत तळ ठोकून होते. भिवंडी व मुंबईतील कार्यक्रमातून सोलापूरच्या सभेला कितपत वेळ मिळेल याबाबत चाचपणी करण्यात आली. त्यामुळे सोलापूर दौºयाचे वेळापत्रक सांगण्यात आलेले नाही.

यापूर्वी प्रदेश कमिटीच्या सूचनेप्रमाणे शहर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी मात्र सभेच्या तयारीला लागले आहेत. प्रारंभी सभेसाठी तीन ठिकाणे पाहण्यात आली होती. चौथ्यांदा भवानीपेठेतील जय भवानी प्रशालेचे मैदान सुचविण्यात आले होते. पण आता कार्यकर्त्यांकडून   सभेसाठी इंदिरा गांधी पार्क स्टेडियमच पर्याय होऊ शकतो असा आग्रह धरला आहे. पंतप्रधानांनी ९ जानेवारी रोजी याच ठिकाणी घोषणाबाजी केली होती. त्या गर्दीला उत्तर देण्यासाठी याच ठिकाणी सभा घ्यावी असे मत अनेकांनी पदाधिकाºयांसमोर व्यक्त केले आहे. त्यामुळे प्रदेश कमिटीकडून दौरा निश्चित झाल्यावर सभेसाठी या पाचव्या    पर्यायाचा विचार केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

दौºयाबाबत साशंकता
- राहुल गांधी यांचा दौरा सोमवारी जाहीर होणार होता. पण रात्री उशिरापर्यंत प्रदेश कमिटीकडून कोणताच निरोप आलेला नव्हता. प्रदेशाध्यक्षासह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे दिल्लीत तळ ठोकून होते. पण निरोप न मिळाल्याने दौºयाबाबत काँग्रेस कार्यकर्ते साशंक झाले आहेत. १३ फेब्रुवारी रोजी मुंबई व भिवंडी दौºयातून सोलापूरच्या सभेला किती वेळ मिळू शकतो याची चाचपणी सुरू असल्याचे सूत्राने सांगितले. 

Web Title: Rahul Gandhi's meeting in Solapur, continuation of the survey of the land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.