शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

'सेतू'चा 'हेतू' असफल!

By admin | Updated: June 30, 2014 13:42 IST

अनेक कारणांनी गाजलेले जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालय नागरिकांच्या सोईसाठी आहे की गैरसोईसाठी असा प्रश्न प्रत्येकाला पडत आहे.

 

शिवाजी सुरवसे■ सोलापूर
अनेक कारणांनी गाजलेले जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालय नागरिकांच्या सोईसाठी आहे की गैरसोईसाठी असा प्रश्न प्रत्येकाला पडत आहे. ओबीसी, एससी, एसटीचे तब्बल अडीच हजारांहून अधिक दाखले प्रलंबित आहेत. कोणतेही दाखले वेळेत मिळत नाहीत, त्यामुळे शासनाचा सेतू चालविण्याचा 'हेतू' असफल झाल्याचे दिसून येते. 
प्रतिज्ञापत्र, शिधापत्रिका, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नान क्रिमीलिअरचे दाखले, शिधापत्रिका आदी अनेक कारणांसाठी नागरिकांना सेतू कार्यालयाकडे यावे लागते. विविध कार्यालयांकडे न जाता नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व दाखले मिळावेत हा सेतू चालविण्याचा हेतू होता मात्र सध्या तरी याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. त्यामुळे सेतू कार्यालयात आणि बाहेर मंगळवार बाजार भरल्याचे दिसते. नियोजन नाही, अनेक अधिकार्‍यांकडे विविध पदभार यामुळे सेतू कामकाजाकडे वेळ द्यायला कोणालाही वेळ नाही. ओबीसींचे तब्बल दोन हजार दाखले प्रलंबित आहेत. एससी, एसटीचे ५00 दाखले प्रलंबित आहेत, त्यामुळे नागरिक वैतागले आहेत. गेल्या १५ दिवसांपासून सेतूमध्ये तोबा गर्दी आहे, मात्र याचे नियोजन केले जात नाही. सेतूमध्ये विविध प्रकारची दररोज सुमारे एक हजार प्रकरणे दाखल होतात मात्र ठरल्यावेळेत या प्रकरणांचा निपटारा होत नाही. सेतू कार्यालय नव्हते त्यावेळी नागरिकांची वेळेवर, विनाकटकट समस्या सुटत होत होती, त्यामुळे आता सेतूचा हेतू सफल झाला नाही असे दिसते. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि सोलापूर शहरातील विविध नागरिकांच्या सुविधांसाठी असलेल्या या सेतूकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. 
 
गतवर्षीच्या तुलनेत यंदा गर्दी कमी आहे. सेतूमध्ये ६२ लोक कार्यरत असून त्यामध्ये ३५ ऑपरेटर आहेत. दररोज एक हजारापेक्षा अधिक प्रकरणे सादर होतात. शाळा, कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया असल्यामुळे सध्या गर्दी जास्त आहे.
- रणजितसिंह ठाकूर,सेतूचालक ठेकेदार