चिखर्डेच्या सरपंचपदी प्रकाश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:20 IST2021-03-07T04:20:31+5:302021-03-07T04:20:31+5:30

सरपंचपदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात प्रकाश पाटील यांना १० मते पडली तर संभाजी कोंढारे यांना एका मतावर ...

Prakash Patil as Sarpanch of Chikharde | चिखर्डेच्या सरपंचपदी प्रकाश पाटील

चिखर्डेच्या सरपंचपदी प्रकाश पाटील

सरपंचपदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात प्रकाश पाटील यांना १० मते पडली तर संभाजी कोंढारे यांना एका मतावर समाधान मानावे लागले.

निवडीप्रसंगी नवनिर्वाचित सदस्य प्राजक्ता कोंढारे, संभाजी कोंढारे, फुलबाई अपुणे, हिना शेख, सुभाष देवकर, माधुरी पाचकवडे, जयराम आडगळे, जनाबाई यादव, शोभा मसेकर उपस्थित होते.

आ.राजेंद्र राऊत गटाने सर्व जागा जिंकत ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. यावेळी अमित कोंढारे, विजय कोंढारे, आयूब शेख, बाळासाहेब कोंढारे, प्रदीप पाचकवडे, संदेश देवकर, नाना कोंढारे, दिगंबर मसेकर उपस्थित होते. निवडीनंतर गावात गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माने यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी डी. के. कांबळे यांनी काम पाहिले.

फोटो

०६चिखर्डे०१

चिखर्डेच्या सरपंच, उपसरपंच यांच्या सत्काराप्रसंगी सर्व सदस्य व ग्रामस्थ.

Web Title: Prakash Patil as Sarpanch of Chikharde